पुणे

डॉ. मनीषा गरूड यांना ‘डीडीआय आरोग्य सन्मान २०२१’ पुरस्कार प्रदान
पुणे, आरोग्य

डॉ. मनीषा गरूड यांना ‘डीडीआय आरोग्य सन्मान २०२१’ पुरस्कार प्रदान

पुणे (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : डी डी आय आरोग्य सन्मान हा राज्यस्तरीय जूरी आधारित अवॉर्ड समारोह नुकताच मुंबईील राजभवन येथे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशीयारी यांच्या हस्ते पार पडला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आयुर्वेद मॉडर्न मेडिसिन होमिओपॅथी दंतवैद्यक शास्त्र आणि परिचारिका विभाग ८० नोमिनीस मधून २० अंतिम निवडले गेले. प्रत्येक विभागातून चार जूरी नेमण्यात आले. त्यापैकी एकच महिला वूमन डेंटल कौन्सिलचा राष्ट्रीय सचिव डॉ. मनीषा गरुड यांची नेमणूक झाली होती. दरम्यान, दंत विभागात चंद्रपूरचे डॉ. राजीव बोरले यांना जीवन गौरव पुरस्कार आणि ठाण्याचे डॉ. अनिश नवरे यांना रफीउद्दीन अहमद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डी डी आय चे पदाधिकारी डॉ.मनोज देशपांडे, डॉ. देवेंद्र हंबर्डेकर, डॉ. गिरीश कामत यांचेही आरोग्य सन्मान पुरस्काराचे हे तिसरे वर्ष आहे. राज्यपाल भगतसिंग कोशीयारी यांनी सगळ्या पुरस्क...
प्रा. धनाजी उर्फ धनंजय सोमनाथ भिसे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. जाहीर
पुणे, शैक्षणिक

प्रा. धनाजी उर्फ धनंजय सोमनाथ भिसे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. जाहीर

डॉ. धनाजी भिसे पुणे (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पीएच.डी. ही संशोधनपदवी जाहिर केली. त्याबाबतच्या खुल्या परीक्षेचे आयोजन विद्यापीठाच्या मराठी विभागामध्ये मराठी विभागप्रमुख डॉ. प्रभाकर देसाई ह्यांच्या अध्यक्षतेखाली आणि बहि:स्थ परीक्षक डॉ.सतीश बडवे (औरंगाबाद) ह्यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. त्याला ८२ हून अधिक व्यक्तींनी ऑनलाईन उपस्थिती लावली होती. डॉ. भिसे ह्यांनी पीएचडीसाठी डॉ. बाबासाहेब शेंडगे (रयत शिक्षण संस्थेचे एस. एस. जी. एम. कॉलेज, कोपरगाव) ह्यांच्या मार्गदर्शनाखाली 'इ.स. २००० ते २०१० मधील दलित आत्मकथने : एक शोध' ह्या शीर्षकाचा प्रबंध विद्यापीठाला सादर केलेला होता. या खुल्या परिक्षेला माजी कुलगुरु डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, माजी कुलगुरु एस. एन. पठाण, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस, प्राचार्य डॉ अविनाश सांगोलकर, प्र...
तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी १०१५ कोटींचा निधी मंजूर
पुणे

तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी १०१५ कोटींचा निधी मंजूर

खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार सुनील शेळके यांच्या सामुहीक प्रयत्नांना यश पुणे (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार सुनील शेळके यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने या ५४ कि. मी. लांबीच्या रस्त्यासाठी १०१५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्याचबरोबर शिरूर तालुक्यातील न्हावरा ते चौफुला रस्त्यासाठीही २२० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर आधी पायाभूत सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे खासदार झाल्यानंतर डॉ. कोल्हे यांनी रस्ते विकासाच्या प्रलंबित कामांवर लक्ष केंद्रित केले होते. त्यानुसार तळेगाव - चाकण - शिक्रापूर रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामासाठी खासदार डॉ. कोल्हे व आमदार सुनील ...
डॉ. आंबेडकर महाविद्यालयात रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न
पुणे

डॉ. आंबेडकर महाविद्यालयात रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न

औंध : रयत शिक्षण संस्थेचे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील पुण्यतिथी कार्यक्रम ऑनलाईन पध्दतीने संपन्न झाला. महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ.अरुण आंधळे साहेब यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्या प्रा. डॉ. जयश्री मगदूम मॅडम तर अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ. संजय नगरकर सर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा.डॉ. जयश्री मगदूम यांनी लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांचा जीवनपट उलगडून दाखविला. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यास लक्ष्मी वहिनींनी आयुष्यभर साथ दिली. आपल्याकडील समाजसुधारकांना सामाजिक कार्य करीत असताना सावित्रीबाई फुले यांनी महात्मा जोतिराव फुले यांना तर साधनाताई आमटे यांनी बाबा आमटे यांना आय...
डॉ. आंबेडकर महाविद्यालयात जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी संपन्न
पुणे, शैक्षणिक

डॉ. आंबेडकर महाविद्यालयात जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी संपन्न

औंध : येथील रयत शिक्षण संस्थेचे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पुणे महानगरपालिकेतील विधी विभागाच्या कायदेशीर सल्लागार मा. अँड. मंजुषा इधाटे मॅडम उपस्थित होत्या. यावेळी मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या महिलांना रोजच्या दिवशी सन्मानाची वागणूक मिळायला पाहिजे. महिलांनी स्वतःच्या आवडीचे क्षेत्र निवडून त्यामध्ये स्वयंप्रेरणेने नावलौकिक मिळवावा. आईने केलेल्या संस्कारांवर मुलांच्या विकासाचा व विचारांचा पाया रचला जातो. शिक्षणामुळे महिलांना आर्थिक अधिकार व स्वातंत्र्य मिळाले आहे. समाजाने स्त्रियांना सन्मानपूर्वक वागणूक द्यायला पाहिजे. महिलांनी समाजाप्रती बांधिलकीची भावना जोपासत सामाजिक कार्य करावे. असे आवाहन मा. अँड. मंजुषा इधाटे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे सन्माननीय प्र...
डॉ. आंबेडकर महाविद्यालयाने बाणेर येथील तुकाई टेकडीवर केले वृक्षारोपण
पुणे, शैक्षणिक

डॉ. आंबेडकर महाविद्यालयाने बाणेर येथील तुकाई टेकडीवर केले वृक्षारोपण

पुणे : रयत शिक्षण संस्थेचे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, रयत विध्यार्थी परिषद आणि वसुंधरा अभियान, बाणेर यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त वड, जांभूळ, सिताफळ तसेच चिंच अशा विविध जातीच्या देशी फळझाडांचे वृक्षारोपण केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण आंधळे साहेब यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी बोलताना लावलेल्या वृक्षांचे जतन करण्याचे आश्वासन प्राचार्य डॉ.अरुण आंधळे साहेब यांनी दिले. तसेच आज आपण जलसंधारण, मृदासंधारण, वृक्ष संवर्धन केले तरच भावी पिढीसाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व सुंदर पर्यावरण मिळू शकेल. असे मत व्यक्त केले. यावेळी वसुंधरा अभियान परिवाराच्या वतीने सांगण्यात आले की, सन 2006 पासून राष्ट्रीय सेवा योजना व पर्यावरण प्रेमी यांच्या सहकार्याने हळूहळू संपूर्ण टेकडी हिरवीगार बनविण्याचे स्वप्न ...
डाॅ. आंबेडकर महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा विविध उपक्रमांनी साजरा
पुणे, शैक्षणिक

डाॅ. आंबेडकर महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा विविध उपक्रमांनी साजरा

डॉ. शिरीष लांडगे-पाटील औंध : रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील मराठी विभागाने 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' विविध उपक्रमांनी साजरा केला. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन मराठी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे, पश्चिम विभागीय अध्यक्ष अँड.राम काडंगे साहेब व माजी विद्यार्थी सूर्यकांत सरवदे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत महाविद्यालयातील ३०० विद्यार्थीनी सहभाग घेतला.. विद्यार्थ्यांनी पु. ल. देशपांडे लिखित 'विठ्ठल तो आला आला' या एकांकिकेचे ऑनलाईन वाचन केले. यामध्ये महाविद्यालयातील अक्षय होळकर (विठ्ठल), आकाश टेंभुर्णीकर(भटजी), चंद्रकांत सोनवणे(वकील), सुयोग भोसले(डॉक्टर), परमेश्वर रिठे(शेठजी), हर्षद जानराव(मास्तर), कोमल जाविर(सखुबाई), रेणूका मीठे(द्वारकाबाई), अरुणा साबळे(गायिका), अविनाश पांडे(शिंपी)...
डॉ. आंबेडकर महाविद्यालयात ‘राष्ट्रीय मतदार जागृती दिन’ साजरा
पुणे, शैक्षणिक

डॉ. आंबेडकर महाविद्यालयात ‘राष्ट्रीय मतदार जागृती दिन’ साजरा

औंध : येथील रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत 'राष्ट्रीय मतदार जागृती दिन' साजरा करण्यात आला. (मतदार बना, सुशिक्षित, जागृत व निर्भय बना) आपल्या लोकशाही देशात प्रतिनिधी निवडून देण्याची प्रक्रिया महत्त्वाची आहे. म्हणून कोणत्याही लोकशाही देशात मतदान यंत्रणा महत्त्वाची असते. भारत देशात मतदारांमध्ये जाणीव जागृती निर्माण करण्याच्या हेतूने राष्ट्रीय मतदार दिन सादर केला जातो. 11 व्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने मतदार बना, सुशिक्षित, जागृत व निर्भय बना अशा हेतूने डॉ.आंबेडकर महाविद्यालयात सामाजिक सुरक्षित अंतर राखून मतदार जाणीव जागृतीचा उपक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.रमेश रणदिवे सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मतदानाची पार्श्वभूमी सांगताना ते म्हणाले इ. स....
डॉ. आंबेडकर महाविद्यालयात दंत आरोग्य चिकित्सा मार्गदर्शनपर उपक्रम संपन्न
आरोग्य, पुणे

डॉ. आंबेडकर महाविद्यालयात दंत आरोग्य चिकित्सा मार्गदर्शनपर उपक्रम संपन्न

औंध : रयत शिक्षण संस्थेचे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात अर्थशास्त्र विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, प्राथमिक विद्यामंदिर व जिल्हा आरोग्य केंद्र, औंध यांच्या संयुक्त विद्यमाने 'दंत आरोग्य चिकित्सा' मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी दंतवैद्य जिल्हा रुग्णालय औंध येथील डॉ. सुहासिनी घाणेकर (Dr. Suhasini Ghanekar ) या उपस्थित होत्या. त्यांनी प्राथमिक शाळेतील मुलांना व पालकांना मार्गदर्शन केले. त्यांनी सुरुवातीला चांगल्या दातांचे महत्त्व पटवून दिले. दात खराब असतील, किडलेले असतील, तुटलेले असतील, वाकडेतिकडे उगवले असतील तर अशा व्यक्तीचे सौंदर्य लोप पावते. मुलांचे दात दुखत असतील तर मुले रात्रभर पालकांना झोपू देत नाही. पालकांचे दात दुखत असतील तर वेदना जाणवल्यामुळे कामावर लक्ष लागत नाही. यासाठी दातांची निगा प्रत्येकाने राखली पाहिजे. मुलांचे व पालकांचे दात ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात युवा दिन संपन्न
पुणे, शैक्षणिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात युवा दिन संपन्न

पुणे : औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने स्वामी विवेकानंद यांच्या जयंती सप्ताहाच्या निमित्ताने युवा दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त मराठी विभागप्रमुख व महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी “स्वामी विवेकानंद व आजचा युवक” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.. स्वामी विवेकानंद यांनी स्वतःचे आयुष्य कष्टाने व्यतीत केले. त्यांनी युवकांना स्वामी विवेकानंदांचे आदर्श घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. आजच्या काळात सगळ्या गोष्टी सहजपणे मिळविण्याच्या नादात अनेक वेळा चुकीच्या मार्गांचा अवलंब केला जात आहे. परिणामतः युवकांना मेहनत व चांगल्या सवयी यापासून दूर राहावे लागत आहे. स्वामी विवेकानंद यांचा मित्रपरिवार, त्यांनी शिकागो येथे केलेल्या सर्वधर्म परिषदेतील भाषण, त्यांनी गुरु प्रती ठेवलेली श्रद्धा या सर्व युवकांना प्रेरणा दे...