सामाजिक

रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी तर्फे वारकऱ्यांची आरोग्य तपासणी
सामाजिक, महाराष्ट्र

रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी तर्फे वारकऱ्यांची आरोग्य तपासणी

कर्जत, ता. ५ (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ कर्जत (Karjat) सिटीच्या वतीने वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सोमवारी (ता. ४) श्री आशितोष महादेव पायी दिंडी ही कर्जतहुन पंढरपूरकडे प्रस्थान करीत असताना कर्जत तालुक्यातील धांडेवाडी येथे मुक्कामी होती. रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचे सचिव प्रा. सचिन धांडे यांच्याकडे पंगतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीच्या वतीने सर्व वारकऱ्यांचे आरोग्य तपासणी घेण्यात आली. यात एकूण १५० वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आरोग्य तपासणीसाठी रोटरीयन डॉ. विजयकुमार चव्हाण डॉ. अद्वैत काकडे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचे नूतन अध्यक्ष अभयकुमार बोरा, सचिव प्रा. सचिन धांडे माजी अध्यक्ष इंजि. रामदास काळदाते, माजी सचिव राजेंद्र जगताप, माजी अध्यक्ष प्रा. विशाल म्हेत्रे, दयानंद पाटील, संदीप गदादे, सदाशिव फरांडे, सुरेश...
उन्नतीच्या वर्धापनदिनानिमित्त सप्ताहभर विधायक उपक्रमांची रेलचेल ; मोफत डोळे तपासणी शिबीरास नागरिकांचा उस्फुर्त सहभाग
पिंपरी चिंचवड, सामाजिक

उन्नतीच्या वर्धापनदिनानिमित्त सप्ताहभर विधायक उपक्रमांची रेलचेल ; मोफत डोळे तपासणी शिबीरास नागरिकांचा उस्फुर्त सहभाग

उन्नतीचा सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक, पर्यावरणीय जडणघडणीत सहभाग - कुंदाताई भिसे पिंपरी : पिंपळे सौदागर येथील उन्नति सोशल फाउंडेशनच्या (Unnati Social Foundation) ५ व्या वर्धापन दिनानिमित्त अध्यक्षा कुंदाताई संजय भिसे यांच्या वतीने प्रभाग क्रमांक ४० मधील नागरिकांसाठी सप्ताहभर विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि. २६) रोजी मोफत डोळे तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच दवा इंडिया या जेनेरिक फार्मसी कंपनीच्या सहकार्याने ग्राहकांच्या मेडिकल बिलांवर येत्या १५ जुलैपर्यंत ९० टक्के सवलत दिली जाणार आहे, या योजनेचाही यावेळी शुभारंभ करण्यात आला. शिबिरातील सहभागी लाभार्थ्यांची मशीनमधून डोळे तपासणी करण्यात आली. तज्ञांकडून आजाराबाबत सल्ला आणि मार्गदर्शन करण्यात आले. अचूक चष्म्याचा नंबर काढून देण्यात आला. यावेळी उन्नति सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे, ...
बार्टी व एमसीईडी तर्फे मोफत उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरूवात
पुणे, सामाजिक

बार्टी व एमसीईडी तर्फे मोफत उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरूवात

बार्टी द्वारा स्थापित अनुसुचित जाती स्वयं सहाय्यता युवा गटाला दिले जाणार महिनाभर प्रशिक्षण लोकमराठी न्यूज नेटवर्क शिवाजीनगर : बार्टी द्वारा स्थापित अनुसुचित जातीचा स्वयं सहाय्यता युवा गटातील युवक-युवतींकरिता एक महिना कालावधीचा मोफत (अनिवासी) उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे सोमवारपासून (ता. ६ जून) सुरूवात करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (BARTI) पुणे, पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) शिवाजीनगर, पुणे येथे हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन बार्टीचे उपायुक्त उमेश सोनवणे, समतादूत विभाग प्रमुख नितीन सहारे, एमसीईडीचे विभागीय अधिकारी सुदाम थोटे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी प्रकल्प अधिकारी जागृती गायकवाड, प्रकल्प अधिकारी शितल बंडगर, प्रकल्प अधिकारी मनुकुमार शेळके, एमसीईडीचे प्रकल्प समन्वयक स...
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त डॉ. डी. वाय. पाटील परिवारतर्फे वृक्षारोपण
पिंपरी चिंचवड, सामाजिक

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त डॉ. डी. वाय. पाटील परिवारतर्फे वृक्षारोपण

पिंपरी : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून डॉ. डी. वाय. पाटील डेंटल कॉलेज आणि डॉ. डी. वाय. परिवार यांच्या पुढाकाराने दुर्गा टेकडी इथे पक्षांसाठी विविध फळ झाडांचे रोपण करण्यात आले. त्याप्रसंगी जगा व जगू द्या चे डॉ संदीप बाहेती, उद्यान प्रमुख श्री. वाईकर, डेंटल कॉलेजचे डॉ. प्रज्ञा बारसे, डॉ. गौरी भोसले, डॉ. उत्कर्षा चौधरी, डॉ. श्रुती तुंगार इत्यादी उपस्थित होते. निसर्ग हाच आपला पालनकर्ता असून त्याचे संरक्षण आणि जोपासना करणे, हे आपले कर्तव्य आहे. असा संदेश डॉ. डी. वाय. पाटील परिवारतर्फे देण्यात आला. निसर्ग आपले निरंतर कोड कौतुक आणि पालन पोषण करत असतो. त्यावर आपण निरंतर प्रेम केले पाहिजे, असे डॉ संदीप बाहेती म्हणाले. आजचे वृक्षारोपण हे अविस्मरणीय असून ही संधी आम्हाला आज मिळाली, याचा आम्हास अत्यानंद होत आहे. असे मनोगत उपस्थित डेंटल कॉलेजच्या डॉक्टरांनी व्यक्त केले....
वृक्षमित्र अरुण पवार यांनी मुला-मुलींना दिली पर्यावरण रक्षणाची शपथ
सामाजिक, पिंपरी चिंचवड

वृक्षमित्र अरुण पवार यांनी मुला-मुलींना दिली पर्यावरण रक्षणाची शपथ

लेवा भातृ मंडळाच्या वतीने आयोजित उन्हाळी शिबिराचा समारोप चिंचवड : शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाचे महत्त्व रुजावे, या उद्देशाने वृक्षमित्र व मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी मुला मुलींना वृक्षारोपण व पर्यावरण रक्षणाची शपथ दिली. तसेच मुला मुलींसमवेत भंडारा डोंगराच्या पायथ्याशी लावण्यात आलेल्या वृक्षांना पाणी घालून प्रत्येकाने एक तरी झाड लावून ते जपावे, असे आवाहन वृक्षमित्र अरुण पवार यांनी केले. मुला-मुलींनी कुटुंबात जेवढ्या व्यक्ती असतील, तेवढी झाडे लावण्याचे यावेळी आश्वासन दिले. निमित्त होते पिंपळे सौदागर येथील लेवा भातृ मंडळाच्या वतीने भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल ज्ञान मंदिर, निगडी येथे आयोजित उन्हाळी शिबिराच्या समारोपाचे. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अरुण पवार उपस्थित होते. विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक सारिका पाटील व मनीषा...
आधार कार्ड नोंदणी कॅम्पला रहाटणीकरांचा उदंड प्रतिसाद
पिंपरी चिंचवड, सामाजिक

आधार कार्ड नोंदणी कॅम्पला रहाटणीकरांचा उदंड प्रतिसाद

नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी देविदास तांबे यांनी केले होते आयोजन रहाटणी, ता. २० मे : चिंचवड विधानसभेचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा सांगवी काळवाडी मंडल अध्यक्ष देविदास अप्पा तांबे यांनी रहाटणीकरांसाठी नवीन आधार कार्ड व आधार कार्ड व आधार कार्ड दुरुस्ती दोन तीन दिवशीय कॅम्पचे नुकतेच आयोजन केले होते. या कॅम्पला राहटणींकरांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिला. विविध सरकारी व निमसरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी व बँकेच्या कामकाजात सध्या आधार कार्ड गरजेचे आहे. मात्र पूर्वीप्रमाणे आता आधार कार्ड काढण्याची तात्पुरती केंद्रे मोठ्या प्रमाणात आढळून येत नाहीत. तसेच आता शाळा, कॉलेज सुरु होत असल्याने आधार कार्ड आवश्यक आहे. दैनंदिन कामकाजातून नागरिकांना वेळ मिळत नाही तसेच कामगार व नोकरदार वर्गाला वेळ काढून महाईसेवा केंद्र अथवा पोस्टात जाने शक्य होत नाही, त्यामुळे नागरिकां...
चिंचवडगावात प्रबुद्ध संघातर्फे बुद्ध जयंती उत्साहात साजरी
सामाजिक

चिंचवडगावात प्रबुद्ध संघातर्फे बुद्ध जयंती उत्साहात साजरी

पिंपरी : चिंचवडगाव येथे प्रबुद्ध संघाच्या वतीने बुद्ध जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला भंते सुमेध बोधी उपस्थित होते. बुद्ध जयंती निमित्त सुरवातीला पंचशील झेंडा फडकविण्यात आला. या नंतर भंते यांनी मार्गदर्शन केले. भंते सुमेध बोधी यांनी आपल्या धम्म देशने मध्ये सांगितले की, जगात एकच धम्म संस्थापक असा आहे, त्यांच्या जीवनात तीन घटना घडल्या त्यामध्ये जन्म, महानिर्वाण व ज्ञान प्राप्ती ही एकाच दिवशी झाली. वैशाख पौर्णिमेला झाली म्हणून हा दिवस बौद्ध राष्ट्रांत अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. बुद्ध धम्म महान आहे, काल संगत आहे, म्हणून आचरण करणे आवश्यक आहे. प्रचार, प्रसार करणे गरजेचे असून तरच भारत देशात बुद्ध धम्म वाढला जाईल. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रबुद्ध संघ सचिव आयुष्यमान किशन बलखंडे यांनी केले. प्रास्ताविक अध्यक्ष किशोर सोनवणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मह...
सामाजिक उपक्रमांनी कोमल सचिन काळे यांचा वाढदिवस साजरा
पिंपरी चिंचवड, सामाजिक

सामाजिक उपक्रमांनी कोमल सचिन काळे यांचा वाढदिवस साजरा

काळेवाडीत पाच पाणपोईचे लोकार्पण तर शाळेला वीस महापुरुषांच्या प्रतिमा भेट पिंपरी, ता. २३ : काळेवाडी येथील शिवशाही महिला बचत गटाच्या अध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या कोमल सचिन काळे यांचा वाढदिवस विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोमल काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सचिन काळे सोशल फाउंडेशनच्या वतीने काळेवाडी प्रभागात पाच ठिकाणी सार्वजनिक मोफत पाणपोईचे उदघाट्न करण्यात आले. याप्रसंगी माजी विरोधी पक्षनेते तथा माजी नगरसेवक नाना काटे, माजी नगरसेवक विनोद नढे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष इमरान शेख, संगीता कोकणे, जयदीप जोगदंड यांच्यासह सचिन काळे सोशल फाउंडेशनचे सर्व सदस्य आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच मावळ तालुक्यातील पांगळोली या अतिशय दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेला वीस महापुरुषांच्या प्र...
महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मानवता हिताय सोशल फाउंडेशनतर्फे अनोखा उपक्रम
पिंपरी चिंचवड, सामाजिक

महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मानवता हिताय सोशल फाउंडेशनतर्फे अनोखा उपक्रम

पिंपरी : गांधीनगर येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले हॉलमध्ये ज्ञानसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त मानवता हिताय सोशल फाउंडेशनचा वतीने अनोखा उपक्रम राबविण्यात आला. जयंती नाचून साजरी करण्यापेक्षा महापुरुषांना वाचून साजरी करण्यात यावी, ह्या उद्देश्याने विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. ज्यामध्ये प्रामुख्याने परीक्षा पॅड, वही व पेनाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी बाबासाहेबांच्या जीवनातील विविध पैलूवर वक्ते प्रदीप मस्के यांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे समीर मसुळकर, सद्गुरू कदम, सोनाली तुषार हिंगे, माधवी शिंदे, अश्विनी महावीर कांबळे, सोनाली दळवी आदी मान्यवरांनी हजेरी लावली. त्यावेळी मानवता हिताय संस्थेचे अध्यक्ष धनराजसिंग चौधरी, उपाध्यक्ष विशाल वाली, नवनाथ मित्र म...
मनसे युवानेते प्रविण माळी यांच्यातर्फे शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक

मनसे युवानेते प्रविण माळी यांच्यातर्फे शालेय साहित्याचे वाटप

पिंपरी : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून मनसे युवानेते प्रविण माळी आणि सामाजिक कार्यकर्त्या अस्मिता माळी यांच्या माध्यमातून रावेत, शिंदेवस्ती प्रभागातील गरजू विद्यार्थांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. बहुसंख्य विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते ओंकार शिंगटे, मोहमद शेख, युवराज बनसोडे आदी उपस्थित होते....