क्रीडा

नगरसेविका सविता खुळे यांच्यातर्फे कुस्ती निवड चाचणी स्पर्धातील विजेत्यांचा सत्कार
क्रीडा, पिंपरी चिंचवड

नगरसेविका सविता खुळे यांच्यातर्फे कुस्ती निवड चाचणी स्पर्धातील विजेत्यांचा सत्कार

रहाटणी : पिंपरी चिंचवड कुस्ती निवड चाचणी स्पर्धामध्ये ऋषिकेश संजय नखाते (६१ किलो), यश शरद नखाते (माती- ८६ किलो), राजू बाळासाहेब हिप्परकर (७४ किलो- मॅट) मोहन रामचंद्र कोकाटे (८७ किलो) आदी सर्व विजेत्या खेळाडूंचे नगरसेविका सविता बाळकृष्ण खुळे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी युवा महाराष्ट्र केसरी किशोर नखाते, महाराष्ट्र चॅम्पियन बाबा तांबे, शाहू केसरी अजय कदम, पिंपरी चिंचवड केसरी निलेश नखाते, महाराष्ट्र चॅम्पियन शिवराज तांबे, काळूराम कवितके, राजू बालवडकर, श्याम गोडांबे, माउली जाधव, रंजीत घुमरे, मेजर कोडक, मेजर काशीद व इतर मान्यवर उपस्थित होते. https://youtu.be/k-_1ee84j4E ...
सुवर्णयुग मित्र मंडळ पिंपळे सौदागरमधील एक आदर्श मंडळ | उन्नती फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांचे गौरवोद्गार
क्रीडा, पिंपरी चिंचवड

सुवर्णयुग मित्र मंडळ पिंपळे सौदागरमधील एक आदर्श मंडळ | उन्नती फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांचे गौरवोद्गार

पिंपळे सौदागर : काही गणेश मंडळे मोठमोठे लाउडस्पीकर लावून मोठ्याप्रमाणात ध्वनी प्रदूषण करतात. मात्र, सुवर्णयुग मित्र मंडळाने सामाजिक कार्यक्रम घेऊन लहान मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे सुवर्णयुग मित्र मंडळ पिंपळे सौदागरमधील एक आदर्श मंडळ आहे. असे गौरवोद्गार उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांना येथे मंडळाचे कौतुक करताना काढले. सुवर्णयुग मित्र मंडळातर्फे गणेशोत्सवामध्ये लहान मुलांसाठी कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्यांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे व फाउंडेशनचे संस्थापक संजय तात्याबा भिसे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. त्यावेळी कुंदा भिसे बोलत होत्या. त्याप्रसंगी विकास काटे, पंडितजी मित्रा, जोराराम परमार, अभिजित म्हेत्रे, विनायक म्हेत्रे, हेमंत मोपारी,...
चेसबॉक्सिंग राष्ट्रीय चॅम्पियनशिप २०२१ मध्ये संदीप यादवने पटकावले सुवर्णपदक
क्रीडा

चेसबॉक्सिंग राष्ट्रीय चॅम्पियनशिप २०२१ मध्ये संदीप यादवने पटकावले सुवर्णपदक

पुणे: पीसीएसएफ बॉक्सिंग क्लबचे विद्यार्थी संदीप सीताराम यादव कोलकाता येथे आयोजित 9 व्या चेसबॉक्सिंग राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2021 मध्ये सुवर्णपदक जिंकले. ते कमांडिंग ऑफिसर कर्नल गुरतेज सिंग यांच्या अंतर्गत भारतीय सैन्य 101 इंजिनीअर रेजिमेंट मध्ये सेवा देत आहेत. कर्नल गुरतेज सिंह आणि कॅप्टन रंगत सिंह यांनी संदीप यादव यांचे कौतुक केले. कर्नल गुरतेज सिंग, कॅप्टन रंगत सिंह आणि त्यांच्या रेजिमेंटच्या सर्व सदस्यांच्या पाठिंब्यामुळे आणि प्रेरणेमुळे तो सुवर्ण मिळवू शकला, असे संदीपने सांगितले. ...
वुसू इंटरनॅशनल मार्शल आर्ट्सच्या विद्यार्थ्यांचे आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत यश
क्रीडा

वुसू इंटरनॅशनल मार्शल आर्ट्सच्या विद्यार्थ्यांचे आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत यश

लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी : मुंबई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत वुसू इंटरनॅशनल मार्शल आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. या विद्यार्थ्यांना सुनिता ढीलो, वैभव साळुंखे व उमा काळे यांचे प्रशिक्षण मिळाले. यशस्वी विद्यार्थ्यांची नावे खालीलप्रमाणे : सुवर्ण पदक : आसद जलगेरी, उत्कर्ष होलम, भाविका गुंजाळ, जतीन शर्मा, तपस्या विश्वकर्मा, सोहिनी भिंगारे, समीक्षा जगताप, सोनू शर्मा, निषा गुप्ता, धनश्री गुंजाळ, संस्कृती माने, अमित यादव, नैतिक वारीशे. रौप्यपदक : विष्णु यादव, सानिका चव्हाण, चंदन बरून, शरयू खंडारे, दीपक पाटील, आकांक्षा कांबळे, अमय कांबळे, आयुष यादव. कांस्य पदक : किरण शर्मा, सोनिका शर्मा, वैभव साळुंके, भुमिका शर्मा, वेदिका भिंगारे. या विद्यार्थ्यांना बॉबी अगरवाल व विक्रम मराठे यांचे मार्गदर्शन मिळाले. ...
पुणे, क्रीडा

‘ज्युनिअर मिस्टर इंडिया बॉडीबिल्डिंग स्पर्धेत’ शुभम वाईकरला गोल्ड मेडल

लोकमराठी न्यूज नेटवर्क औंध (प्रतिनिधी) : आय.बी.बी.एस.एस. असोसिएशनच्या वतीने ओडिसा येथील बालेश्वर येथे आयोजित केलेल्या 'ज्युनिअर मिस्टर इंडिया बॉडीबिल्डिंग स्पर्धेमध्ये' औंध येथील रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील शुभम वाईकर या विद्यार्थ्याने ७० किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवित, 'ज्युनिअर मिस्टर इंडिया बॉडीबिल्डिंग स्पर्धेत' गोल्ड मेडल पदक मिळविले. ही स्पर्धा ८ व ९ फेब्रुवारी रोजी पार पडली. त्याच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी त्यांचे अभिनंदन करून, त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्याच्या या यशामध्ये महाविद्यालयाच्या प्राचार्यांसह क्रीडा विभागप्रमुख प्रा. बी.एस. पाटील, उपप्राचार्य डॉ. संजय नगरकर तसेच सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक आणि महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग अ...
चिंचवडमध्ये साह्यथॉन मिनी मॅरॉथॉनचे आयोजन 
पिंपरी चिंचवड, क्रीडा

चिंचवडमध्ये साह्यथॉन मिनी मॅरॉथॉनचे आयोजन

चिंचवड, (लोकमराठी) : श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान व सह्यकडा ऍडव्हेंचर प्रतिष्ठान यांच्या वतीने 12 जानेवारीला सकाळी 6 वाजता मिनी मॅरॉथॉनचे आयोजन केले आहे. 'एक पाऊल आरोग्यासाठी' या ब्रीद वाक्य घेऊन 2018 सुरु केलेल्या साह्यथॉन या मिनी मॅरॉथॉनचे हे तिसरे वर्ष आहे. जास्तीत जास्त लोकांनी घराच्या बाहेर पडावे, हे उद्दिष्ट असते. यामध्ये 3, 5 व 10 किलोमीटर असे अंतर ठेवले आहे. सहभागासाठी कमीत कमी फी ठेवली असून चिंचवड-शिवतेजनगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिर येथे मॅरेथॉनचे रेजिस्ट्रेशन सुरु झाले आहे. तरी लवकरात लवकर आपले रेजिस्ट्रेशन करावे,असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व मा. नगरसेवक नारायण बहिरवाडे यांनी केले आहे....
सृजन करंडक 2019 आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेत आबेदा इनामदार संघाचा उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
क्रीडा

सृजन करंडक 2019 आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेत आबेदा इनामदार संघाचा उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

पुणे ( लोकमराठी ) : आबेदा इनामदार महाविद्यालयाने नियोजनबद्ध खेळ करताना कावेरी कॉलेजचा 3-1 असा पराभव करून सृजन करंडक 2019 आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. जीडीएफएच्या ढोबरवाडी मैदानावर झालेल्या सामन्यात विजयी संघाला कावेरी महाविद्यालयाच्या खेळाडूंनी केलेला कडवा प्रतिकार सहन करावा लागला. पूर्वार्धाथ 17व्या मिनिटाला अमित चव्हाणने केलेल्या गोलच्या जोरावर त्यांनी मध्यंतराला 1-0 शी आघाडी घेतली होती. उत्तरार्धाज जावेद अहमद याने 24व्या मिनिटाला गोल करून संघाची आघाडी 2-0 अशी वाढवली. भक्‍कम बचाव करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कावेरी महाविद्यालयाचे खाते प्रभास भांगे याने 32व्या मिनिटाला उघडले. मात्र, त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. अचूक नियोजन असणाऱ्या आबेदा महाविद्यालयाच्या खेळाडूंनी आपले वर्चस्व कायम राखले. आवेझ शेख याने 39व्या मिनिटाला गोल करून संघाच...
क्रीडा

तायक्वांदो स्पर्धेत वुसु मार्शल आर्टला व्दितीय चषक

लोकमराठी न्यूज नेटवर्क पुणे : राज्यतरीय तायक्वांदो चॅम्पीयनशीप स्पर्धेत आकुर्डीतील वुसु इंटरनॅशनल मार्शल आर्टच्या खेळाडूंनी दुसऱ्या क्रमांकाचे चषक पटकावले. पदके मिळालेल्या खेळाडूंची नावे खालीलप्रमाणे : सुवर्ण : अंकीत राई, आकांशा जाधव, रेहान शेख, नेहा हिंगमिरे, श्रुती पवार, धनश्री गुंजाळ, वैष्णवी साळुंखे, दत्ता हसोळकर, सामिक्षा जगताप, अमय देवाडीया, अमित यादव, आरती बांबे, चंदन बस्त, सानिका भालेकर, ममता राठोड, दिपक पाटील. कांस्यपदक : अभिनव कुऱ्हाडे, तेजस चौरे, कुणाल गाढवे, स्वप्नील चौरे, नितेश हिगमिरे यशस्वी खेळाडूंना प्रशिक्षक उमा काळे, विक्रम मराठे, वैभव साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले. तर प्रविण निमगिरे, विवेकबापू घुले पाटील, तेजस्विनी कदम, विनोद पवार, अविनाश उंदरे, शितल नायर, सीमा काकडे, सारिका माळी यांनी स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केले. रौप्यपदक :...