मतदार जनजागृतीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे सायक्लोथाॅन मोहिम

मतदार जनजागृतीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे सायक्लोथाॅन मोहिम

पिंपरी : भारत निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार पुनरिक्षण मोहीम राबविण्यात येत असून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विविध प्रकारे जनजागृती करण्यात येत आहे. आज पुणे सायक्लोथाॅन मोहिम पिंपरी चिंचवड शहरात राबविण्यात आली होती.

त्याचे उद्घाटन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक सुनिल शेट्टी तसेच महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश उपस्थित होते.

त्याचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुक विभागाचे नोडल अधिकारी अण्णा बोदडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृती करण्यात आली.

१ ते ३० नोव्हेंबर दरम्यान मतदार नोंदणी व पुनरिक्षण मोहीम सुरू करण्यात आली असून नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवावेत असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.