वायरल

Viral Videos, Viral News

Viralvideo : प्रेमाच्या त्रिकोणातून मैत्रीचा संघर्ष; दोन मुलींची तुफान हाणामारी
वायरल

Viralvideo : प्रेमाच्या त्रिकोणातून मैत्रीचा संघर्ष; दोन मुलींची तुफान हाणामारी

नवी दिल्ली – सोशल मीडियावर दोन तरुणींच्या रस्त्यावर झालेल्या वादाचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दोघीही घनिष्ठ मैत्रिणी होत्या, पण त्यांच्यातील संघर्ष एका मुलावरून झाला. माहितीनुसार, या दोघींना एकाच मुलाची आवड होती. त्यापैकी एका मुलीने त्या मुलाला किस केल्याचे दुसऱ्या मैत्रिणीला समजले. या प्रकारावरून त्या दोघींमध्ये वाद झाला. विशेष म्हणजे, दुसऱ्या मैत्रिणीने त्या दोघांचा व्हिडिओ काढून तो संबंधित मुलीच्या आईला पाठवण्याची धमकी दिली. हा वाद वाढत जाऊन दोघींमध्ये रस्त्यावरच हाणामारी झाली. उपस्थितांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, पण दोघीही संतापाच्या भरात एकमेकींवर तुटून पडल्या. याचा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, यावर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. ही घटना पाहता, नातेसंबंधांमधील गैरसमज आणि तणाव कसा वाढतो, या...
मराठा आरक्षणा संबंधी समन्वयकांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपची उच्चस्तरीय चौकशी करा 
पिंपरी चिंचवड, वायरल

मराठा आरक्षणा संबंधी समन्वयकांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपची उच्चस्तरीय चौकशी करा

संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतिश काळे यांची राज्यपालांकडे मागणी पिंपरी : गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांवर मराठा आरक्षण शमविण्यासाठी मराठा मोर्चाच्या स्वयंघोषित समन्वयकांची एक ऑडिओ क्लिप वायरल झाली आहे. या क्लिपमध्ये मराठा आरक्षण शमविण्यासाठी आंदोलनात फूट पाडण्याच्या हेतूने तात्कालिन सत्ताधारी नेत्यांनी पैशाची देवाण-घेवाण केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. यामधील संबंधीत आत्ताचे मराठा आरक्षण उप-समितीचे अध्यक्ष व विद्यमान मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना पैशांचे आमिष दाखवून मराठा आरक्षणा संदर्भांत निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या काही स्वयंघोषित समन्वयकांबरोबर प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचे सदर ऑडिओ क्लिपच्या संभाषणावरुन स्पष्ट होत आहे.त्यामुळे व्हायरल झालेल्या ऑडिओ तात्काळ चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी, ...
निवडणुकीत आपल्यासाठी चांगला आणि स्वस्त दवाखाना व शाळा आणि रोजगार मागू…मंदिर, मस्जिद नाही
वायरल

निवडणुकीत आपल्यासाठी चांगला आणि स्वस्त दवाखाना व शाळा आणि रोजगार मागू…मंदिर, मस्जिद नाही

क्रिकेटर युवराज सिंहने कॅन्सरचा इलाज बाहेर देशात केला. मनिषा कोईरालानी तिचा इलाज बाहेर देशातच केला. सोनिया गांधीचा पण बाहेर देशातच इलाज करणं चालू आहे. शरद पवार पण त्यांचा इलाज बाहेर देशातच करतात. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि हिंदी सिनेमाचे अभिनेता इरफान खान आजारी पडले आणि भारतात हवा तसा इलाज न झाल्यामुळे बाहेर देशात गेले. भारतामध्ये ना मंदिराची कमी आहे ना मस्जिदची. जगातील सर्वात शक्तिशाली ईश्वर कदाचित भारतातच असतील. मग ही लोकं इलाज करण्यासाठी बाहेर देशात का जात आहेत. भावांनो शरीरातील रोगांचा इलाज विज्ञानाद्वारा होतो, ही सत्य गोष्ट आहे आणि आपला भारत विज्ञानाच्या क्षेत्रात मागे आहे, म्हणूनच ही लोकं बाहेर इलाज करत आहेत. असच म्हणावं लागेल. जर आपल्याला असा आजार झाला तर आपल मरण नक्की आहे. इतके पैसे आपल्याकडे कुठून येतील बाहेर देशात जाण्यासाठी. मग नंतर बहाणा असेल मरायची वेळ ...
वेळेनुसार बदला….
वायरल

वेळेनुसार बदला….

१९९८ मध्ये Kodak कंपनीत १,७०,००० कर्मचारी काम करीत होते,ती कंपनी जगातील सर्वात जास्त८५% फोटो पेपर बनवून विकत होती. काही वर्षांनंतर Digital photography नं कंपनीला बाजारातून बाहेर काढून टाकलं kodak कंपनीचं अक्षरशहा दिवाळं निघालं सर्व कामगार रस्त्यावर आले. HMT ( घड्याळ )BAJAJ (स्कुटर)DYNORA (टीव्ही)MURPHY (रेडिओ)NOKIA (मोबाईल)RAJDOOT (बाईक)AMBASDOR (कार) या सर्व कंपन्यांच्या गुणवत्तेत कोणत्याही प्रकारची कमतरता नव्हती तरीसुद्धा त्या बाजारातून बाहेर फेकल्या गेल्या.कारण?ह्या कंपन्या वेळे नुसार बदलल्या नाहीत. तूम्हाला अंदाज नसेल कि येणाऱ्या १० वर्षाच्या काळात जग पूर्णतः बदलून जाईल आणि आज चालणारे ७० ते ९०% उद्योगधंदे बंद होतील!! चौथ्या औद्योगिक क्रांती मध्ये आपलं स्वागत… Uber हे फक्त एक software आहे! त्याची स्वत:ची एकही car नाही ! तरीही ती जगातील सर्वांत मोठी Taxi company आहे! Ai...
कंगना राणावतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा | संभाजी ब्रिगेडचे धरणे आंदोलन
पिंपरी चिंचवड, वायरल

कंगना राणावतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा | संभाजी ब्रिगेडचे धरणे आंदोलन

पिंपरी : डांगे चौक थेरगाव येथे देशद्रोही कंगना राणावत हिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तिचा पद्म भूषण पुरस्कार काढून घ्यावा या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या धरणे आंदोलन करण्यात आले. राणावत यानी केलेलं वक्तव्य अतिशय निंदनीय आहे ती म्हणाली सन '1947' ला मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नव्हतं तर भीक होती आणि जे स्वातंत्र्य मिळालं आहे, ते 2014 मध्ये मिळालं आहे, असं वादग्रस्त वक्तव्य टाइम्स नाऊ या वृत्त वाहिनीतील कार्यक्रमात अभिनेत्री कंगना राणावत हिने केले आहे. ते सर्व प्रसिद्धी माध्यमातून दाखवण्यात येत आहे. या तिच्या वक्तव्याचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाहीर तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत आहोत. तसेच देशविरोधी वक्तव्य करणाऱ्या कंगना राणावत हिच्या वर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात येऊन कडक कारवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. कायम वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहण्यासाठी प्...
तरसाशी सामना करणाऱ्या पंडीत गाडे यांच्या धाडसाचा सन्मान
पुणे, वायरल

तरसाशी सामना करणाऱ्या पंडीत गाडे यांच्या धाडसाचा सन्मान

व्हिडीओ पहा :https://youtube.com/shorts/kifIPA9dkdU?feature=share पुणे : खेडच्या खरपुडीत तरसाने एका बाबांवर हल्ला केल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होतोय. तरुणाई तरसाला पाहून धूम ठोकताना, व्हिडीओ काढताना दिसतेय, पण अशा अचानक झालेल्या हल्ल्यात जाधव बाबांचे प्राण वाचवण्यासाठी, प्रसंगावधान राखत पंडीत गाडे बाबांच्याच हातची काठी घेऊन जिवाची पर्वा न करता त्या तरसावर तुटून पडले. आणि जाधव बाबांना हिंस्त्र तरसाच्या तावडीतून सोडले. सारे खरपुडीकर सांगतात, तिथे पंडीत गाडे नसते तर कदाचित आज जाधव बाबांच्या जिवावर बेतले असते. अशा धाडशी व्यक्तिमत्वाचे अभिनंदन व्हावे, त्यांना प्रोत्साहन मिळावे, उमलत्या पिढीने, तरुणाईने त्यांचा आदर्श घ्यावा. या भावनेतून खेड तालुका शिक्षक संघाचे मा. अध्यक्ष धर्मराज पवळे यांनी खरपुडीत जाऊन त्यांचा सन्मान केला. यावर पंडीत गाडे म्हणाले, "रस्त्यावर अपघात...
पहाटेची अमर्याद ताकद|तुम्ही सकाळी किती वाजता उठता?
वायरल

पहाटेची अमर्याद ताकद|तुम्ही सकाळी किती वाजता उठता?

झोपायला कितीही उशीर झाला तरी, तरी रोज पहाटे लवकर उठायला हवं! मोठी माणसं सांगायची,“लवकर निजे, लवकर उठे, त्यास आयु-आरोग्य लाभे !”आणि ते खरं आहे, हेल एरॉल्ड नावाचं एक जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे, ते एक प्रचंड यशस्वी व्यावसायीक होते, मोठ्या जिद्दीने त्यांनी एका अपघातामुळे आलेल्या शारिरीक विकलांगतेवर मात केली होती. पण २००८ च्या महामंदीत त्यांचा प्रचंड लॉस झाला, अब्जोपती हेल कर्जबाजारी झाला. पण तो हार मानणारा नव्हता, यातून बाहेर कसं पडावं, हे विचारण्यासाठी तो आपल्या एका यशस्वी मित्राकडे गेला, मित्राने त्याला काय सल्ला दिला असेल बरं? “हेल, तु सकाळी लवकर उठ!” “बाकी सगळं आपोआप होईल”या चमत्कारिक सल्ल्याने हेल निराश झाला, त्याला काहीतरी आगळेवेगळे उपाय अपेक्षित होते,काही दिवस त्याने कसेबसे ढकलले, पण दिवसेंदिवस निराशा त्याला घेरत होती, मग नाईलाज म्हणुन त्याने सकाळी चार वाजता उठायची सुरुवा...
माझ्या खुशीला शोधा! तरूणीची आर्त हाक | शोधुन देणारास बक्षीस
वायरल, पिंपरी चिंचवड

माझ्या खुशीला शोधा! तरूणीची आर्त हाक | शोधुन देणारास बक्षीस

https://youtu.be/sMhZsWa3KLg पिंपरी : "खुशी माझ्या कुटूंबातील सदस्य असून ती गायब झाल्यापासून मला खुप त्रास होताय, कृपया खुशीला शोधून द्या." अशी भाऊक साद घालत तरूणीचे अश्रू अनावर झाले. या तरूणीला खुशीचा ऐवढा लळा लागला आहे की, तीला शोधण्यासाठी ही तरूणी वणवण भटकत आहे. सविस्तर माहिती अशी की, प्रज्ञा पुजारी या तरूणीची खुशी नावाची भारतीय (गावठी) कुत्री तीन दिवसांपासून निगडी परिसरातून हरवली आहे. याबाबत प्रज्ञा यांनी रावेत पोलिस चौकीत तक्रार दाखल केली आहे. या कुत्रीला शोधुन देणारास ३००० रूपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. सदर कुत्री (खुशी) दिसल्यास 7972300958 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन प्रज्ञा यांनी केले आहे....
महात्मा नरेंद्र मोदी म्हणजे विज्ञान वादळ | लेखक नितीन थोरात यांचा उपरोधिक टोला
राजकारण, वायरल

महात्मा नरेंद्र मोदी म्हणजे विज्ञान वादळ | लेखक नितीन थोरात यांचा उपरोधिक टोला

लोकमराठी न्यूज नेटवर्क कोरोना (covid-19) नियंत्रणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) विमानातून औषध फवारणी करणार आहेत. या संदर्भातील लेखक नितीन थोरात यांची उपरोधिक पोस्ट मोदी समर्थकांनी खरी समजून मोठ्या प्रमाणावर व्हायरल केली होती. त्यावेळी अगदी खेड्यापाड्यात लोकांनी घरात कोंडून घेतले होते. त्याप्रमाणेच आता लेखक नितीन थोरात यांनी 'महात्मा नरेंद्र मोदी म्हणजे विज्ञान वादळ' या मथळ्याखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे. थोरात यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, प्रत्येक गुलाम गारठून थंड पडावा, अशी बातमी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आठ क्लोन तयार करण्यात आले आहेत. अमेरिकन गुप्तफेर यंत्रणेतल्या विश्वसनीय सुत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. भारतात आजवर कोणत्याही पंतप्रधानाचे क्लोन बनविण्यात आले नव्हते, त्यामुळे मोदी साहेबांच्या चाणक्य निती कौशल्याची झलक प...