नागरिकांनी भारतीय संविधानाप्रत जागरूक रहावे – प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड

नागरिकांनी भारतीय संविधानाप्रत जागरूक रहावे - प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड

पिंपरी : ‘मागील काही काळ हा आपल्या सर्वांच्यासाठीच आव्हानात्मक असा राहिलेला आहे. कोरोना या विषाणूचा प्रसार, त्यामुळे लॉकडाऊनचे बंधन, त्यातून उद्भवलेली बेरोजगारी, महागाई या सर्व समस्यांना आपण तोंड देत आहोत. आता परिस्थिती लसीकरण आदी उपाययोजनांमुळे सुरळीत होत आहे. आपणही आता भारतीय संविधानाप्रत जागरूक राहून देशाची सर्व व्यवस्था मुळ पदावर आणण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे’, असे उद्गार पिंपरी येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड यांनी संविधान दिनाच्या निमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उच्चारले.

नागरिकांनी भारतीय संविधानाप्रत जागरूक रहावे - प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड

येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात नुकताच ‘भारतीय संविधान दिन’ साजरा करण्यात आला . या निमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . पांडुरंग गायकवाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थीवर्ग यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. संदिप नन्नावरे यांनी केले. उद्देशिकेचे वाचन प्रा. विद्यासागर वाघेरे यांनी केले. आभार प्रदर्शन विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रमुख डॉ. पांडुरंग भोसले यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे कला व वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्या डॉ. मृणालिनी शेखर, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य प्रा. शहाजी मोरे, कार्यालयाचे प्रमुख श्री. राजेंद्र गायकवाड, सौ. उज्वला तावरे महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी वर्ग तसेच बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.