हडपसर (प्रतिनिधी) : आजादी का अमृत महोत्सव व युवा सप्ताहानिमित्त एस. एम. जोशी कॉलेजमधील आय.क्यू.ए.सी. ग्रंथालय विभाग व हेरिटेज फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्यक्तिमत्व आणि कौशल्य विकास या विषयावर ग्रंथालय विभागाच्या वतीने ऑनलाईन राज्यस्तरीय व्याख्यानमाला दिनांक 14 जानेवारी ते 24 जानेवारी या काळात आयोजित करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंद्रकांत खिलारे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी या वयात अभ्यास करून आपल्या आवडत्या क्षेत्रात करियर केले पाहिजे. समाजाची सेवा करायची असेल तर अधिकारी या पदावर जाण्याची गरज आहे. त्यातून आपण समाजाचे ऋण फेडू शकतो. असे विचार व्यक्त केले. हेरिटेज फाउंडेशनचे डायरेक्टर भुजंग बोबडे म्हणाले अभ्यासातूनच आपण आपल्याला सिद्ध केले पाहिजे. ग्रंथालयातील व ऑनलाईन पुस्तके वाचून आपण चांगले व प्रामाणिक अधिकारी झाले पाहिजे. असे विचार व्यक्त केले.
पोलीस उपअधीक्षक धनंजय पाटील यांनी एम.पी.एस.सी. व यू.पी.एस.सी. च्या परीक्षांची तयारी कशी करावी याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. उपजिल्हाधिकारी मानसी पाटील यांनी प्रामाणिकपणे कष्ट केल्यास तुम्हाला यश हमखास मिळेल. ध्येयवादाने झपाटून जा. कष्टातच यश दडलेले असते. आपणच आपल्यातील क्षमता ओळखून क्षेत्र निवडावे. वेळेचे नियोजन करून अभ्यास केल्यास यश हमकास मिळेल. असे विचार व्यक्त केले.
डॉ. जॉन्सन वडकल यांनी नेव्हीमधील संधी या विषयावर मार्गदर्शन केले. नेव्हीच्या क्षेत्रात खूप संधी आहेत. याचा युवकांनी लाभ घ्यावा. असे ते म्हणाले .असिस्टंट कमिशनर समाधान महाजन यांनी स्पर्धा परीक्षा आणि ताण तणाव व्यवस्थापन या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. राज्यस्तरीय व्याख्यानमालेचे समन्वयक ग्रंथपाल प्रा. शोभा कोरडे, डॉ. शकुंतला सावंत, डॉ.किशोर काकडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, उपप्राचार्य प्रा. संजय जडे, डॉ.सुनील खुंटे, डॉ.अशोक पांढरबळे, डॉ.एम एन. रास्ते, प्रा.डॉ.राजेंद्र ठाकरे, डॉ.अतुल चौरे यांनी सहकार्य केले.