PCMC|निगडीत रविवारी रोटरी सायक्लोथॉनचे आयोजन

पिंपरी : रोटरी क्लब ऑफ पिंपरीच्या वतीने महिला सुरक्षा जनजागृती साठी रोटरी सायक्लोथॉनचे रविवारी (दि. २) आयोजन केले आहे.

निगडी येथील नियोजित महापौर निवास मैदान येथे सकाळी ५ वा सायक्लोथॉन होणार आहे. या वेळी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर व पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त संदीप बिश्नोई यांच्या हस्ते उद्घाटन केले जाणार आहे. ५० किमी, २५ किमी, १० किमी असे गटात सायकल पट्टू धावणार आहे. या सायक्लोथॉनमध्ये जास्तीत जास्त नागरीकांनी सहभागी व्हावे. असे आवाहन आयोजक अध्यक्ष कृष्णा सिंघल, सचिव संतोष गिरंजे यांनी केले आहे.