काँग्रेसची पहिली जाहिर सभा काळेवाडीत | काँग्रेसचे युवा नेते रवि नांगरे यांनी केले होते आयोजन

काँग्रेसची पहिली जाहिर सभा काळेवाडीत | काँग्रेसचे युवा नेते रवि नांगरे यांनी केले होते आयोजन
  • स्थानिक समस्यांना फोडली वाचा

काळेवाडी : आगामी महापालिका निवडणुकीचे रणशिंग काँग्रेसने फुंकले असून काँग्रेसची पहिलीच जाहिर सभा काळेवाडीत झाली. या सभेचे आयोजन काँग्रेसचे युवा नेते व रॉयल फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष रवि नांगरे यांनी केले होते. त्यावेळी अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव पृथ्वीराज साठे व शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी विशेष हजेरी लावत, सभेला संबोधित केले.

त्याप्रसंगी

त्याप्रसंगी माजी प्रदेश अध्यक्ष पर्यावरण विभाग अशोक मोरे, अॅड. सोपान माने, माजी महापौर कवीचंद भाट, युवक काँग्रेस अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, माजी महिला प्रदेशाध्यक्षा शामला सोनवणे, वालिया अल्पसंख्यांक प्रदेश सदस्य राजेंद्र सिंग,

महिला नेत्या छाया देसले, सेवादलाचे अध्यक्ष नरेंद्र गायकवाड पिंपरी विधानसभा युवक अध्यक्ष हिराचंद जाधव, एनएसयूआयचे उपाध्यक्ष उमेश खंदारे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माउली मलशेट्टी, युनुस आतार, सज्जी वर्की व किरण नढे, वसीम इनामदार, अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष शहाबुद्दीन शेख, प्रकाश नांगरे, अजय काटे, आनंद भाटे, पंकज पाटोळे, अशोक गायकवाड, नरेंद्र नांगरे, प्रथम नांगरे, प्रकाश पठारे, काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभागाचे शहराध्यक्ष गणेश नांगरे, प्रतीक साळवी, फ्रान्सिस गजभिव, निर्मळ साबळे फादर सालोमन, भंडारी फादर, आशा नांगरे, सामाजिक कार्यकर्त्या गीता यादव, राधा काटे व हिरा साळवे महेंद्र सोनवले, यांच्यासह पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यावेळी पृथ्वीराज साठे यांनी आपल्या भाषणात केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली, तर डॉ. कैलास कदम यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेत सुरू असलेल्या भाजपच्या भ्रष्ट कारभारावर प्रहार करत स्थायी समिती अध्यक्षांचा चांगलाच समाचार घेतला.

काँग्रेसची पहिली जाहिर सभा काळेवाडीत | काँग्रेसचे युवा नेते रवि नांगरे यांनी केले होते आयोजन

आपल्या भाषणात रवि नांगरे म्हणाले की, “काळेवाडीतील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित असून रस्ते, पाणी, वीज व आरोग्य आदी समस्या नित्याच्याच झाल्या आहेत. नगरसेवक हे नगरीचे सेवक असतात, याचा त्यांना विसर पडला आहे. काळेवाडीतील रस्त्यांची कामे व्यवस्थित होत नसल्याने रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते आहेत, हेच कळत नाही.”

पुढे रवि नांगरे म्हणाले की,” कोरोना काळात रॉयल फाउंडेशनचे मोठे योगदान असून गरजूंना मास्क, सेनिटायझर वाटप करण्यात आले. तसेच अनाथाश्रमात अन्नदान व अत्यावश्यक वस्तूं देण्यात आल्या. अशी विविध प्रकारची गोरगरीबांची मदत रॉयल फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आली. हे कार्य पुढे चालत राहणार आहे. त्याबरोबर काँग्रेसच्या सर्वसमावेशक विचारधारेचा सर्वाच्या सहकार्याने तळागाळात पोहचविण्याचा जंग आम्ही बांधला आहे. मला आगामी महापालिका निवडणुकीत आपली सेवा करण्याची संधी दिल्यास, नक्कीच मोठा बदल आपणास दिसेल. यात तिळमात्र शंका नाही.”

सभेचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन विजय ओव्हाळ यांनी केले.