पुणे : पुणे शुक्रवारी दिवसभरात पुणे शहरात चार, तर पिंपरी-चिंचवडमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे पुणे, पिंपरी आणि परिसरातील मृतांची संख्या ७१ झाली आहे. दिवसभरात पुणे शहरात १०४ तर पिंपरी-चिंचवडमध्ये १२ असे ११६ नवे रुग्ण आढळले असून परिसरातील एकूण रुग्णसंख्या ११०१ वर पोहोचली आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयाने शुक्रवारी रात्री याबाबत माहिती दिली आहे. ससून रुग्णालयात उपचार घेणारे ४० आणि ६३ वर्षीय, तर इतर खासगी रुग्णालयात उपचार घेणारे ४० आणि ५२ वर्षीय रुग्ण शुक्रवारी दगावले.
या सर्व रुग्णांना श्वासोच्छ्वासाचे तसेच हृदयरोगाशी संबंधित गुंतागुंतीचे आजार होते. पिंपरी-चिंचवडमध्ये ६५ वर्षीय रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
पुणे शहरातून शुक्रवारी १६ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १४६ झाली आहे. पिंपरी-चिंचवडमधून एकूण २१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
- ‘लाडकी बहीण योजने’साठी पुन्हा मुदतवाढ; आता या तारखेपर्यंत अर्ज करता येणार…
- महिलेच्या धाडसामुळे वाचला तरुणाचा जीव
- तीन लाख लाडक्या ‘बहिणी’ राहिल्या वंचित
- एस. एम. जोशी कॉलेजमध्ये पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137 वी जयंती साजरी
- विद्यार्थ्यांनो आवडीच्या क्षेत्रात करिअर करा; राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचे आवाहन