पुणे (लोकमराठी) : करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुणे शहरातील आणखी २२ भाग पूर्णपणे सील करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, अशी विनंतीही महापैरांनी केली. अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या सर्वांसाठी पुणे पोलिसांनी दिलेले पास १४ एप्रिलऐवजी आता ३० एप्रिलपर्यंत ग्राह्य धरले जाणार आहेत. शिवाय मुदत वाढवल्याची माहिती नागरिकांना मेसेजद्वारे प्राप्त होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
दाट वस्तीमधील करोनाबाधित आणि संशयित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन नव्याने २२ ठिकाणांमध्ये नाकाबंदी करण्यात आली आहे. पाहूयात कोणते २२ भाग सील करण्यात आले आहेत.
सील करण्यात येत असलेले भाग…
१) पत्राचाळ, लेन नंबर १ ते ४८ आणि परिसर, प्रभाग क्रमांक २०
२) संपूर्ण ताडीवाला रोड
३) घोरपडी गाव, विकासनगर, बालाजीनगर, श्रावस्तीनगर, प्रभाग क्रमांक ०२
४) राजेवाडी, पद्मजी पोलीस चौकी, जुना मोटर स्टँड, संत कबीर, AD कॅम्प चौक, क्वार्टर गेट
५) विकासनगर, वानवडी गाव
६) लुम्बिनीनगर, ताडीवाला रोड
७) चिंतामणीनगर, हांडेवादी रोड
८) घोरपडी गाव, BT कवडे रोड
९) संपूर्ण लक्ष्मीनगर, रामनगर, जयजवाननगर, येरवडा प्रभाग ८
१०) पर्वती दर्शन परिसर
११) जुने शिवाजीनगर बसस्थानक परिसर
१२) पाटील इस्टेट परिसर
१३) भोसलेवाडी, वाकडेवाडी
१४) NIBM रोड
१५) कोंढवा खुर्द
१६) कोंढवा बुद्रुक
१७) साईनगर, कोंढवा
१८) विमाननगर
१९) वडगाव शेरी
२०) धानोरी
२१) येरवडा
२२) सय्यदनगर, महंमदवाडी, हडपसर