कोविड योध्दा डॉ. राजेश पाटील यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा

कोविड योध्दा डॉ. राजेश पाटील यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा

  • प्राधिकरणवासीय व प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या वतीने डॉक्टर राजेश यांचा सेवेनिमित्त अनोखा उपक्रम संपन्न.

पिंपरी : ५५ दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरात कोविड १९ विषाणूच्या युद्धात सहभागी असलेले डॉक्टर राजेश पाटील यांचा वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. या प्रसंगी संत साहित्याच्या अभ्यासक श्रीमती मंगलाताई एस. घाळी, संपर्क प्रमुख विजय मुनोत, आकुर्डी गंगानगर विभागीय अध्यक्ष संतोष चव्हाण, साईराज कॉलनी येथील प्रशांत शिंपी, महिला प्रमुख अर्चना घाळी, समिती अध्यक्ष विजय पाटील,अमित डांगे,बाबसाहेब घाळी उपस्थित होते.

त्यांच्या वाढदिवसानिमित प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या वतीने चिंतामणी चौक, स्पाइन रस्ता, प्राधिकरण व निगडी परिसरात परप्रांतीय मजूर व कामगार कुटुंबियाना फळे, ग्लिकोज पावडर, मास्क, सॅनिटायझर बॉटल याचे वाटप करण्यात आले. सदरचे वाटप सुरू असताना डॉक्टर राजेश हे मात्र थरमॅक्स चौक स्थित वेदांत हॉस्पिटल येथे रुग्णांच्या सेवेत कार्यरत होते, सर्वांच्या वतीने व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे त्यांनी शुभेच्छांचा स्विकार केला.

या प्रसंगी डॉ. राजेश पाटील म्हणाले,” अजूनही कोरोनाचे संकट टळलेले नसून शहरात सर्व नागरिकांनी सावधानता बाळगावी व प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. सोशल डिस्टन्स पाळून व स्वतः आरोग्य दक्ष राहून येत्या काही दिवसात आपण ह्या घातक संक्रमण विषाणूवर नक्कीच मात करण्यात यशस्वी होऊ. शिस्तबद्ध गर्दी टाळून आपण वाढदिवसाचे जे नियोजन केले आहे त्यासाठी मी आपला कृतज्ञ आहे. अश्या पद्धतीने वैदयकीय सेवा देणाऱ्यांचा आपण वाढदिवस साजरा केल्याने आम्हास नक्कीच समाज आधार मिळतो.”

संत साहित्याच्या अभ्यासक श्रीमती मंगलाताई घाळी म्हणाल्या,” सध्या कोविड १९ च्या संक्रमन काळात डॉक्टर, पोलीस व स्वच्छता कर्मचारी हे शहरवासीयांसाठी जीवरक्षक देवदूतच आहेत, या योध्यानमुळेच आपले पिंपरी चिंचवड शहर सुरक्षित आहे. मोठी लोकसंख्या असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात हे पहिल्या फळीतील सैनिक निकाराने लढा देत आहेत. डॉक्टर्स स्वतःच्या जीवाची बाजी लावून कोरोना बाधितांची सेवा करीत आहेत.त्यामुळे मोठ्या संख्येने कोरोना बाधितही बरे होऊन घरी रवाना झाले आहेत.अश्यापैकीच डॉक्टर राजेश यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा व आशीर्वाद.”

या प्रसंगी न्युरोलॉजिस्ट डॉ. अमितकुमार पांडे, डॉ. अभिषेक करमळकर, ऑर्थोपेडिक डॉ.निलेश पाटील, डॉ. अतुल केसरकर, डॉ.पंकज नेमाडे, एस.बी.पाटील शैक्षणिक ग्रुपचे सभासद, मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल निकम, तसेच डॉ. राजेश यांचे छोटे बंधू अनिल गोरख पाटील, दीपक गोरख पाटील यांनीही शुभेच्छा दिल्या.