राष्ट्रवादी काँग्रेस कडून गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

राष्ट्रवादी काँग्रेस कडून गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पिंपरी : कोरोना या जीवघेण्या संसर्ग रोगामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लॉक डाऊन करण्यात आल्यामुळे सर्व जनजीवन विस्कळित झाले आहे. याचा सर्वात जास्त फटका हा सर्वसामान्य जनतेला बसताना आपणास दिसत आहे.

अशा परिस्थितीमध्ये काळेवाडी फाटा जवळ मक्का मसजित ड्रायव्हर कॉलनी या भागात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बरकत शेख युवा मंच वतीने जीवनावशयक वस्तूंचे किट राष्ट्रवादी शहर अध्यक्ष संजोग वाघेरे, दिपक चखाले, सागर गायकवाड यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी वसीम खान, समशेर शेख, जलील बागवान आदी उपस्थित होते.

यावेळी शहराध्यक्ष वाघेरे यांनी नागरिकांना, घराबाहेर पडू नका, स्वता:च्या कुटुंबाची काळजी घ्या, असे आवाहन केले. तसेच रमजान ईदच्या खरेदी साठी मोठ्या संख्येने बाहेर पडू नये. साध्या पद्धतीने घरीच ईद साजरी करा, असे बरकत शेख यांनी सांगितले.