- तब्ब्ल १५०० ‘सायकलकरी वारकऱ्यांच्या’ वारीला दाखविला भगवा झेंडा
पिंपरी (दि. ०३) : भारतातील क्रीडा आणि आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या इन्डो अथलेटिक्स सोसायटीच्या सायकल वारीने आज देहू येथील गाथा मंदिर परिसरातून प्रस्थान केले. तब्ब्ल १५०० ‘सायकलकरी वारकऱ्यांच्या’ पुणे-पंढरपूर-पुणे वारीला आज शनिवारी (दि. ३) रोजी पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशनचे (Unnati Social Foundation) संस्थापक संजयशेठ भिसे यांनी भगवा झेंडा दाखवला.
या वारीसाठी आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरामध्ये ऑनलाईन नोंदणी करण्यात आली होती. हे सायकलस्वार तब्बल पाचशे किलोमीटरचे अंतर केवळ दोन दिवसात पार करणार आहेत. सायकल वारीचे हे त्यांचे सातवे वर्ष आहे.
यावेळी एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन वानखेडे, प्रकाश शेडबाळे, उन्नती फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे, वैद्यनाथ हॉस्पिटल औरंगाबादचे डॉक्टर संदीप सानप, अनिल सानप, उद्योजक अण्णा बिरादार, सनदी लेखापाल कृष्णलाल बंसल, परिवहन अधिकारी सुबोध मेडसीकर, महाराष्ट्र पोलीस अधिकारी अजय दरेकर, इंडो ॲथलेटिक्स सोसायटीचे गजानन खैरे,
ह भ प तानाजी काळभोर,गणेश भुजबळ, अजित पाटील, अतुल पाटिल आदी कार्यक्रमप्रसंगी उपस्थित होते.
संजयशेठ भिसे म्हणाले, पंढरीच्या विठुरायाच्या वारीचे अबाल वृद्धांपासून सर्वांनाच कुतुहूल असते. वारीच्या निमित्ताने इन्डो अथलेटिक्स सोसायटीचे सायकलकरी पर्यावरण समतोल राखण्याचा अनोखा संदेश देत आहेत. त्यांच्या या उपक्रमास शुभेच्छा.
हे वारकरी एक दिवसात देहू ते पंढरपूर तर दुसऱ्या दिवशी पंढरपूर ते आळंदी अशी परतीची वारी करणार आहेत. सायकल वारी मार्ग हा देहू,निगडी,नाशिक फाटा, हडपसर, उरुळी कांचन, भिगवन, इंदापूर, टेंभुर्णी, पंढरपूर आणि दुसऱ्या दिवशी याच मार्गावरून परतीचा प्रवास होणार आहे, असे इंडो अथलेटिक्स सोसायटीचे गजानन खैरे यांनी सांगितले.