पुणे : कुरुळी गावच्या उपसरपंचपदी प्रतिभा कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच अनिता बधाले यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी ग्रामविकास अधिकारी कविता कोतवाल यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.
त्यानिमित्त माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम सोनवणे यांच्या हस्ते नवनिर्वाचित उपसरपंच प्रतिभा कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खेड पंचायत समिती सभापती अमर कांबळे, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य कमल कड, माजी सरपंच व विद्यमान सदस्य शरद मुऱ्हे, माजी सरपंच देवराम सोनवणे, कविता गायकवाड, माजी उपसरपंच एम. के. सोनवणे, विजय कांबळे, अमोल सोनवणे, शोभा गायकवाड, नेहा बागडे, विशाल सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य दिपक डोंगरे, गुलाब कांबळे, मनिषा मुऱ्हे, जैदाताई, माधुरी मालशिखर, तसेच माजी सदस्य स्वप्निल काबळे, जितेंद्र कांबळे (SRP खेड ता. अध्यक्ष) पो. पा. प्रतिभा कांबळे व इतर मान्यवर उपस्थित होते.