पिंपरी चिंचवड : उद्योजक सुरेश सखाराम शिंदे (वय ६१, रा. श्रद्धा कॉलनी, ज्योतिबा नगर, काळेवाडी) यांचे रविवारी (ता. ८) दुपारी निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्यानं नातेवाईक व मित्रपरिवाराला जबर धक्का बसला आहे.
काळेवाडीतील एका खाजगी रुग्णालयात उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. वडगाव गुप्ता (ता. व जि. अहमदनगर) या मुळगावी रविवारी रात्री त्यांच्यावर मोठ्या दुख:मय वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुले दोन, एक मुलगी, सुना-नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते अमोल शिंदे व इंजिनिअर सचिन शिंदे यांचे ते वडील होत. ते कायमच पुरोगामी व स्पष्टवक्तेपणा विचाराचे पुरस्कर्ते होते.
भोसरी एमआयडीसीतील कंपनीतून राजीनामा दिल्यानंतर प्रतिकूल परिस्थितीत १९९२ साली त्यांनी आर. एस. इंडस्ट्रीज या कंपनीची स्थापना केली. सुरूवातीपासूनच त्यांनी अनेक आडचणींचा हिमतीने सामना करत आर. एस. इंडस्ट्रीजला मोठ केले. मात्र, काळाने त्यांच्यावरच अचानक घाला घातला.