अंधश्रद्धा निर्मुलन समिती तर्फे ‘एक पोळी होळीची, भुकेलेल्या मुखाची’ पर्यावरण पूरक उपक्रम

अंधश्रद्धा निर्मुलन समिती तर्फे 'एक पोळी होळीची, भुकेलेल्या मुखाची' पर्यावरण पूरक उपक्रम

लोकमराठी न्यूज नेटवर्क

पिंपरी : एक पोळी होळीची भुकेलेल्या मुखाची हा पर्यावरण पूरक उपक्रमांचे अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दरवर्षीप्रमाणे होळीच्या दिवशी आयोजन केले आहे.

अनिस पिंपरी चिंचवड शाखा दरवर्षीप्रमाणे सर्व सामाजिक संघटना व शहरातील नागरिकांना आवाहन करते, की आपण होळीच्या सणाला ज्या पूरण पोळ्या अग्नीस नैवेद्य म्हणून अर्पण करतो, त्याच पोळीने एका गरजू भूकेल्याचे पोट भरुया!

आपल्या विभागवार टीम, सहकारी मंडळे व स्थानिक सामजिक संघटनांच्या मदतीने हा उपक्रम सोमवार (दि. ९ मार्च) राबवत आहे. होळी हा सण पर्यावरण पूरक व पारंपरिक उत्साहाने साजरा करण्यासाठी प्रत्येक जबाबदार नागरिक व मंडळास आपण आवाहन करत आहोत कि, होळी सण साजरा करताना पुढील ठळक मुद्यांचा अवलंब करावाच. परंतु पोळीदान कार्यक्रम जरूर राबवावा.

तसेच होळी हि जास्तीत जास्त २/३ फुट उंचीचीच असावी व त्यात आपण पाला पाचोळा व घरातील मोडकळलेले निरुपयोगी लाकडी वस्तू वापराव्या (झाडे तोडू नये), होळीत अन्न (पुरण पोळी नैवेद्य ) टाकण्याऐवजी विभागातील गरजू गरीब बांधवाना/अनाथ आश्रम अशा ठिकाणी द्यावेत, उत्सवाचा खरा आनंद तोंड गोड करण्यात आहे. चला तर मग “होळीची उंची करु लहान अन होळीची पोळी करु दान.

मागील वर्षी ह्या उपक्रमा अंतर्गत पिंपरी चिंचवड शहरातील मंडळे व देहूरोड भागातील चिंचोली, झेंडेमळा,माळवाडी,व अशा ४-५ ठिकाणी केलेल्या उपक्रमात जवळपास २७०० पुरण पोळ्या गोळा करून त्या गरजू भूकेलेल्यांना खाऊ घातल्या. याही वर्षी हा उपक्रम राबविला जाणार आहे.

आपणही आपल्या होळी जवळ ज्या पोळ्या एकत्र कराल त्या आम्ही गरजूंपर्यंत पोहचविण्यास सहकार्य करू. उपक्रमात सहभाग घेणे व सहकार्य करण्यासाठी सुभाष सोळंकी (7249482020)
तर अंजली इंगळे (9130577402) क्रमांकास संपर्क साधावा असे आवाहन अनिस तर्फे करण्यात आले आहे.