मोबाईल व सोशल मिडीयाचा मर्यादित वापर करावा – वैशाली माने

मोबाईल व सोशल मिडीयाचा मर्यादित वापर करावा - वैशाली माने
स्वकृता चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यक्रमात वैशाली माने यांचा गौरव करताना अश्विनी पटवर्धन, मनाली गाडगीळ, मनाली देव.
  • स्वकृता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने महिलादिन साजरा

पिंपरी : स्त्रीयांनी कोणत्याही क्षेत्रात वावरताना सावधगिरी बाळगावी व आपली वैयक्तीक माहिती कारणाशिवाय कोठेही प्रस्तूत करु नये. मोबाईल व सोशल मिडीयाचा मर्यादित वापर करावा. सोशल मिडीयामध्ये खाजगी फोटो, वैयक्तीक माहिती, बँक खात्यातील माहिती देऊ नये. आपले संरक्षण करण्यात आपणच पुढाकार घ्यावा. पोलीस, प्रशासनाची भूमिका मुख्यत्वे गुन्हा घडल्यानंतर असते. परंतू गुन्हा घडू नये यासाठी सर्वांनी जागृत राहुन सावधानता बाळगावी, असे आवाहन अतिरिक्त पोलीस अधिक्षक वैशाली माने यांनी दिली.

जागतिक महिला दिनानिमित्त चिंचवड येथे ‘स्वकृता चॅरिटेबल ट्रस्टच्या’ वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात वैशाली माने, योग प्रशिक्षक मनाली घारपुरे – देव यांच्या ट्रस्टच्या अध्यक्षा ॲड. मनाली गाडगीळ यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच ट्रस्टच्या संस्थापक संचालिका उज्वला जोशी यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा ‘उज्वला स्मृती पुरस्कार’ या वर्षी वृषाली पटवर्धन यांना शिरिष जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी सचिव अश्विनी पटवर्धन, डॉ. उमा देशमुख, दया पिंगळे, मृणाल केळकर आदी उपस्थित होते.

मनाली घारपुरे – देव यांची अॅड. मनाली गाडगीळ यांनी प्रकट मुलाखत घेतली. यावेळी घारपुरे देव म्हणाल्या की, स्त्रीयांनी कुटूंबाच्या व वैयक्तीक आरोग्यासाठी योगाभ्यास करावा. माझे करिअर घडण्यामध्ये योगासनाचे खूप महत्व आहे.

मोबाईल व सोशल मिडीयाचा मर्यादित वापर करावा - वैशाली माने

स्वागत प्रास्ताविक ॲड. मनाली गाडगीळ, पाहुण्यांची ओळख अश्विनी पटवर्धन, सुत्रसंचालन डॉ. उमा देशमुख, मृणाल केळकर आणि आभार दया पिंगळे यांनी मानले.