तोपर्यंत फेटा बांधणार नाही; राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंचा निर्धार

तोपर्यंत फेटा बांधणार नाही; राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंचा निर्धार

बीड, ता. २५ (लोकमराठी) : बीड जिल्ह्यातील परळी आणि केजमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आमदार निवडून येत नाही, तोपर्यंत बीड जिल्ह्यात आल्यावर फेटा बांधणार नाही, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी केला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसची राज्यात शिवस्वराज्य यात्रा सुरु असून या यात्रेनिमित्त आंबेजोगाई येथे आयोजित सभेत खासदार कोल्हे यांनी होते.

शिवस्वराज्य यात्रा परळीहून अंबाजोगाईला आली असता, परळी आणि केज मतदारसंघात आमचे आमदार जोपर्यंत निवडून येणार नाहीत तोपर्यंत फेटा बांधणार नाही. तसेच जेव्हा आमदार होतील त्याचवेळी या व्यासपीठावर येऊन फेटा बांधेन, असे विधान खासदार अमोल कोल्हे यांनी आयोजित सभेत केले.

राष्ट्रवादीच्या आमदार नमिता मुंदडा यांनी फेटा बांधण्यास घेतला असता त्यास नकार देत कोल्हे यांनी वरील निर्धार व्यक्त केला.

दरम्यान, विधानसभेसाठी परळी मतदारसंघात भाजपच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची लढत त्यांचे बंधू राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यासोबत आहे. पंकजा या २००९ पासून परळी येथे आमदार आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात होणारी लढत अटीतटीची ठरणार आहे.

Actions

Selected media actions