रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी तर्फे वारकऱ्यांची आरोग्य तपासणी

रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी तर्फे वारकऱ्यांची आरोग्य तपासणी

कर्जत, ता. ५ (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ कर्जत (Karjat) सिटीच्या वतीने वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सोमवारी (ता. ४) श्री आशितोष महादेव पायी दिंडी ही कर्जतहुन पंढरपूरकडे प्रस्थान करीत असताना कर्जत तालुक्यातील धांडेवाडी येथे मुक्कामी होती. रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचे सचिव प्रा. सचिन धांडे यांच्याकडे पंगतीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीच्या वतीने सर्व वारकऱ्यांचे आरोग्य तपासणी घेण्यात आली. यात एकूण १५० वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आरोग्य तपासणीसाठी रोटरीयन डॉ. विजयकुमार चव्हाण डॉ. अद्वैत काकडे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचे नूतन अध्यक्ष अभयकुमार बोरा, सचिव प्रा. सचिन धांडे माजी अध्यक्ष इंजि. रामदास काळदाते, माजी सचिव राजेंद्र जगताप, माजी अध्यक्ष प्रा. विशाल म्हेत्रे, दयानंद पाटील, संदीप गदादे, सदाशिव फरांडे, सुरेश नहार, प्रशांत फलके, राहुल खराडे ,ओंकार तोटेआदि सह सर्व सामाजिक संघटनांचे सदस्य उपस्थित होते.

रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी तर्फे वारकऱ्यांची आरोग्य तपासणी

यावेळी हभप. लक्ष्मण शास्त्री कदम महाराज, हभप योगेश महाराज जाधव, हभप. राहुल महाराज , हभप. दीपक महाराज भवर, प्रा. डॉ. संतोष यादव यांनी सचिन धांडे व रोटरी क्लब ऑफ कर्जत चे आभार मानले.

रोटरी क्लब ही एक सामाजिक भान आणि जाणीव जपणारी आंतरराष्ट्रीय पातळीवर संघटना असून या संघटनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम प्राधान्याने राबविले जातात आणि या पुढेही सामाजिक कार्यात रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीच्या माध्यमातून अखंड कार्य सुरू राहील.असे नूतन अध्यक्ष अभयकुमार बोरा यांनी सांगितले.