पुणे : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. पिंपरीतील जिजामाता रूग्णालयासोबत आयोजन केलेल्या या शिबिरात सावली बेघर नागरिक निवारा येथे ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
त्यावेळी जिजाऊ रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिता साबळे, डॉ. गणेश तागडे व डॉ. स्नेहा जगदाळे, फार्मासिस्ट दूधमल जाधव, लॅब टेक्निशियन प्रीती सनगर व त्यांचे सहकारी स्टाफ तसेच आशा वर्कर, हाॅस्पीटल कर्मचारी व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे (Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute) यांचे समतादूत संगीता शहाडे, प्रशांत कुलकर्णी यांनी अथक प्रयत्न करून ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिरचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. या शिबिराचा ५५ ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला.