पिंपरी, ता १३ : पिंपरी चिंचवड शहरात दिवसाढवळ्या वूड माफिया ट्रक घेऊन रस्त्यावरील झाडं तोडत असतात आणि पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त हे मुग गिळून केलेल्या तक्रारींवर गप्प आहेत. असा सवाल वृक्ष मित्र प्रशांत राऊळ यांनी उपस्थित केला आहे.
निगडी येथील यामुनानगरमध्ये फोटोतील व्यक्ती अवैधरित्या वृक्षतोड करताना ऋषिकेश तपशाळकर यांना दिसला. ते बघताच त्यांनी त्याला हटकले आणि वृक्षतोडीची परवानगी मागताच तो तिथून पळून गेला.
त्यामुळे पोलीस आणि पालिका आयुक्त अवैध वृक्षतोडीला संरक्षण देत आहेत का? आणि नाही तर इतक्या तक्रारी करून देखील दुर्लक्ष का केले जात आहे? टेम्पोचा नंबर वैध आहे का? आणि ही लाकडं जातात कुठं? कोण आहे माफिया, जो दोन्ही आयुक्तांनावर दबाब टाकत आहे? असे अनेक प्रश्न वृक्ष मित्र प्रशांत राऊळ यांनी उपस्थित केले आहेत.