कोल्हापूर : कळंबा तलाव परिसरात अतिवृष्टीमुळे शुक्रवारी (ता. १५) उन्मळून पडलेल्या वटवृक्षाला आज निसर्गप्रेमींच्या मदतीमुळे जीवनदान मिळाले. या वटवृक्षाबाबत अभिनेते व सह्याद्री देवराईच्या सयाजी शिंदे यांनी कोल्हापूरातील निसर्गप्रेमींना हाक दिली, व बघता बघता ही बातमी कळताच कोल्हापूर परिसरातील निसर्गप्रेमी एकत्र आले.
सुहास वायंगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली व कळंबा ग्रामपंचायतीचे सरपंच सागर भोगम, निसर्गमित्र परितोष उरकुडे, प्रशांत साळुंखे, अभिजीत वाघमोडे, अमर गावडे, मनीषा ससे, डॉ. सुधीर ससे, समरजीत नाईक यांनी कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीम व संजय घोडावत ग्रुप टीम यांच्या सहकार्याने उन्मळून पडलेले हे वडाचे झाड योग्य टेक्निकल पद्धतीने अगदी कमी वेळात पुनरोपण (Replant) केले.