भाजपच्या मुख्यमंत्र्यांवर टीका केल्यानं पत्रकाराला घरात घुसून मारहाण

भाजपच्या मुख्यमंत्र्यांवर टीका केल्यानं पत्रकाराला घरात घुसून मारहाण

आगरताळा : त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देव यांच्या विरोधात फेसबुकवर पोस्ट केल्यानं एका पत्रकारावर हल्ला झाला आहे. बिप्लव देव यांच्यावर टीका करणारा व्हिडिओ फेसबुकवर टाकल्यानं पत्रकाराला मारहाण केल्याची घटना घडली आहे. जखमी पत्रकारावर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू आहेत.

त्रिपुरातल्या स्थानिक माध्यमांनी कोरोना काळातल्या असुविधांच्या बातम्या प्रसारित केल्या होत्या. त्याबद्दल मुख्यमंत्री देव यांनी एका कार्यक्रमात नाराजी व्यक्त केली होती. माध्यमांना माफ करणार नाही, असं विधान त्यांनी केलं होतं. त्यानंतर एका पत्रकारानं त्यांच्यावर टीका केली होती. त्याच पत्रकाराला मारहाण झाली आहे.

Actions

Selected media actions