काळेवाडी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठांचा सत्कार

काळेवाडी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठांचा सत्कार

पिंपरी : काळेवाडी येथील ज्येष्ठ नागरिक संघाचा २४ वा वर्धापन दिनानिमित्त ‘एक दिवस ज्येष्ठांच्या सन्मानाचा’ हा आनंद सोहळा ज्योतीबा मंगल कार्यालय येथे उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी गायिका रोहिणी घोडेकर प्रस्तुत स्वररंग मराठी, हिंदी गाण्यांच्या कार्यक्रम आयोजित केला होता.

प्रथम गणेश पुजन करून महापौर उषा माई ढोरे, उपमहापौर हिराबाई हुले, कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंत कुमार गुजर, संघाचे अध्यक्ष पदमाकर जांभळे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.

त्याप्रसंगी महासंघाचे अध्यक्ष अरूण बागडे, कार्याध्यक्ष वृषाली मरळ, समाज प्रबोधनकार शारदा मुंढे, नगरसेवक चंद्रकांत नखाते, सुरेश नढे पाटील, नगरसेविका निता पाडळे, उषा काळे, सविता खुळे, सुनीता तापकीर व अश्विनी तापकीर, ज्योती भारती हरेश नखाते, सजी वर्की, बाबा जगताप, काळुराम नढे, बाळासाहेब नढे, सोमनाथ तापकीर, किरण नढे, मच्छिंद्र तापकीर, चंद्रकांत तापकीर, प्रहारचे संजय गायके, संगीता कोकणे, अनिता पांचाळ, प्रकाश लोहार आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी संघाच्या सभासदांचे ७५ वर्षे पुर्ण व लग्नाच्या ५० व्या वाढदिवसानिमित्ताने सत्कार करण्यात आला. वर्धापन दिनाच्या निमित्ताने संघाला आर्थिक देणगी देणार्‍या व्यक्तींचा मान्यवरांच्या व संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाधिकारी, संचालक व महिला संचालिका यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच सर्व सभासदांना स्नेहभोजन देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष पदमाकर जांभळे, सुत्रसंचालन उपाध्यक्ष सुखदेव खेडकर व अभार सह सचिव सुरेश विटकर यांनी मानले.