Kalewadi News : काळेवाडीत रस्त्याच्या डांबरीकरणास सुरूवात

Kalewadi News : काळेवाडीत रस्त्याच्या डांबरीकरणास सुरूवात

काळेवाडी, ता. १७ : नढेनगरमधील नंददीप कॉलनी क्रमांक ४ रस्त्याच्या डांबरीकरण कामास आज सुरूवात करण्यात आली. मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या डांबरीकरणास सुरूवात झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

त्यावेळी नगरसेविका नीता पाडाळे व उषा काळे, नगरसेवक विनोद नढे, माजी नगरसेवक प्रकाश मलशेट्टी, राष्ट्रवादीचे शंकर घनवट, पुष्पा नढे, रवींद्र गरूड, विश्वास घाडगे आदी उपस्थित होते.

” या रस्त्यावर पिण्याच्या पाण्याची लाईन, ड्रेनेज लाईन टाकली आहे. पावसामुळे डांबरीकरणास अडचणी येत होत्या. मात्र, पावसाने उघड दिल्याने डांबरीकरणास सुरूवात करण्यात आली आहे.” – नीता पाडाळे, नगरसेविका