रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज – बाबा कांबळे

रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज - बाबा कांबळे
  • कष्टकरी जनता आघाडीच्या वतीने शिवजयंती उत्साहात

पिंपरी : रयतेच्या भाजीच्या देठाला देखील हात लावू नका, असे बजावून रयतेची काळजी घेणारे आणि खऱ्या अर्थाने रयतेचे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांचे विचार आजच्या काळात देखील जोपासले जात आहेत. आज देशाची झालेली वाताहत पाहता शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणे गरजेचे आहे. खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य निर्माण करायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारच देशाला उपयोगी ठरतील, असे प्रतिपादन कष्टकरी जनता आघाडीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केले.

कष्टकरी जनता आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी नगरसेवक विक्रांत लांडे पाटील, समीर मासुळकर यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या वेळी प्रमुख पाहुणे माजी उपमहापौर तुषार हिंगे, नगरसेवक विक्रांत लांडे पाटील, समीर मासुळकर , बहुजन सम्राट सेनेचे अध्यक्ष संतोष निसर्गगंध,घरकाम महिला आद्याक्षा अशा कांबळे, सदाशिव तळेकर, कष्टकरी कामगार पंचायत कार्याध्यक्ष बळीराम काकडे,दीपक गिरे महाराज,अनिल गाडे,इसाक भाई, महारष्ट्र रिक्षा पंचायत कार्याध्यक्ष राज शेलार, रविंद्र लंके, अविनाश जोगदंड, राम शिंदे, आपरोच कोतवाल, प्रमोद शेलार, सूरज सोनावणे, नंदलाल निकम, विकास आढळे, बबन काळे, सतीश चौरे, बांधकाम ठेकेदार पंचायत, राजू साहू, रणजित साह, मुकेश ठाकूर, कष्टकरी जनता आघाडी गौरी शेलार, माधुरा डांगे,रेखा भालेराव, पाटील ताई, शर्मा ताई, उषा पुजारे, वर्षा सोनवणे, अंजु कांबळे, छाया कलवले, अंजली कांबळे, काजल कांबळे, सुनीता यंशवते आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

बाबा कांबळे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी पिचलेल्या मनात स्वातंत्र्याची बीजे पेरली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने हिंदवी स्वराज्याची पहाट निर्माण झाली. महाराजांनी निर्माण केलेल्या रयतेच्या राज्याची ख्याती जगभर पसरली आहे. स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवून सुराज्य स्थापित करणारे सहिष्णू राजे शिवाजी महाराज होते. सर्व रयतेचा सन्मान त्यांनी केला. जातीभेदाच्या पलीकडे जाऊन त्यांनी प्रत्येक जातीधर्माच्या माणसांना एकत्र केले. त्यांना मावळे असे संबोधले. या मावळ्यांच्या सोबत शत्रूंना नामोहरम करण्याचे काम महाराजांनी केले. या बरोबरच राज्य निर्माण करण्यासाठी नियोजनबद्ध धोरणे देखील आखली. त्यांचे हे विचार जपल्यास देशाची उत्तम निर्मिती होईल असे प्रतिपादन बाबा कांबळे यांनी केले. प्रस्तावना इसाक राज, सूत्रसंचालन अविनाश जोगदंड यांनी केली. आभार सदाशिव तळेकर यांनी मानले.