एस. एम. जोशी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केले मासचे वाटप

एस. एम. जोशी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केले मासचे वाटप

हडपसर – २८ नोव्हेंबर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागामार्फत हडपसर परिसरातील गरजू लोकांना मासचे वाटप केले. सध्या कोव्हिडचा वाढता प्रभाव लक्षात घेता‌. रस्त्यावर राहणाऱ्या आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्या लोकांना मेडीकल मास्कचे वाटप करण्यात आले. यांमध्ये रस्त्यावर राहणारे लोक, झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या लोकांसाठी मास्कचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंद्रकांत खिलारे साहेब यांनी मार्गदर्शन केले. तर या उपक्रमाचे संयोजन अर्थशास्त्र विभागप्रमुख डाॅ. एकनाथ मुंढे, प्रा.अशोक कांबळे, डाॅ.विश्वास देशमुख, प्रा.सय्यद इम्तियाज यांनी केले.

या उपक्रमामध्ये महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागातील शुभंम शेंडे, रेणूका लोहार, शिवाणी देवकर, साक्षी चौधरी, वैष्णवी पवार, ऋषीकेश शिंदे या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन आर्थिकदृष्ट्या गरीब आणि बेघर लोकांना मासचे वाटप केले.