
उस्मानाबाद : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य माणसाप्रमाणे मुक्या प्राण्यांनाही झळ पोहचत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील (परांडा) सोनारी येथे माकडांचे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य आहे. येथील कालभैरवनाथ मंदिर सुरक्षिततेसाठी भाविकांसाठी बंद असल्याने माकडांना खायला मिळणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे या वन्यप्राण्यांना पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघ व सोनारी ग्रामस्थांच्या वतीने खाद्य पुरविण्यात सुविधा केली आहे.
या सुविधेचा शुभारंभ मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, भैरवनाथ अन्नछत्र ट्रस्टचे अध्यक्ष महेश कारकर, कोषाध्यक्ष रविंद्र खुळे, सहसचिव अशोक माने, सदस्य भिमा घाडगे, डोनजे गावचे सरपंच गजेंद्र सूर्यवंशी, संतोष भोरे, बापू शिंदे, विलास शिंदे, दिनेश घोगरे, सचिन भोरे, विनायक गंगाविठ्ठल, अक्षय भोरे, अक्षय भोरे अशोक भोरे, चंद्रकांत भोरे, हनुमंत गोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
येथील माकडांसाठी काकडी, डाळिंब, केळी, गाजर, टोमॅटो, मक्याची कणसे, पपई आदी पुरविण्यात आली आहेत. त्यामुळे 450 ते 500 माकडांची उपासमार टळणार आहे. गेल्या काही वर्षापासून तुळजापूर, उस्मानाबाद तालुक्यातील जनावरांना व वन्य प्राण्यांना पाण्याअभावी जिवास मुकावे लागू नये, म्हणून सिमेंटच्या 500 लिटर क्षमतेच्या 107 टाक्या ठेवून 'पशुधन वाचावा' मोहीम हाती घेतलेली आहे. त्यामुळे माकडे, हरिण, भटकी जनावरे, मोर, इतर पक्ष्यांची पाण्यावाचूनची ससेहोलपट थांबण्यास मदत झाली आहे.
यासोबतच संघाच्या वतीने पिंपरी चिंचवड शहर परिसरात 370 गरजूंना गहु, तांदुळ, बेसन, तुरडाळ, पोहे, तेल, साखर, चहा पावडर, मिरची पावडर असे धान्य १० दिवस पुरेल याप्रमाणे किट वाटप करण्यात आली. कोरोनापासून बचावासाठी मास्क, सॅनिटायझर किटचे वाटप करण्यात आले. तसेच पोलिसांना मास्कची गरज लक्षात घेऊन महाएनजीओ (सातारा) येथे फेडरेशनच्या साहाय्याने शंभर मास्क ह.भ.प. अक्षय महाराज भोसले यांच्यावतीने शंभर मास्क पोलिसांसाठी देण्यात आले.
लॉकडाऊनमुळे माणसांप्रमाणे मुक्या प्राण्यांना त्रास सहन करावा लागत आहे. माणसांना बोलता येते, तसेच त्यांना विविध ठिकाणांहून मदत दिली जात आहे. माकडांसारख्या वन्यप्राण्यांना खाद्याअभावी प्राणांना मुकावे लागू नये, यासाठी सोनारी येथील माकडांना खाद्याची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी दिली.
- HADAPSAR : राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी निःस्वार्थ भावनेने समाजाची सेवा करतात - डॉ. सदानंद भोसले
- Santosh Deshmukh : प्रिय संतोष देशमुख, तुमच्या खूनाचे फोटो मी बघितलेच नाहीत - हेरंब कुलकर्णी
- HADAPSAR : एस. एम. जोशी महाविद्यालयात “एसएम टेक्नो वेंझा 2K25" स्पर्धेचे आयोजन
- Pimpri Chinchwad : ‘द पॅशन ऑफ ख्राईस्ट’ महानाट्यातून उलडणार येशू ख्रिस्ताचे दुखःसहन
- International Women's Days : वंचितांसाठी झटणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आदिती निकम