काळेवाडी : विजयनगर, पवनानगर व आदर्शनगर परिसरात डासांचे प्रमाण वाढले असून नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच मलेरिया व डेंग्यू सारखे आजार पसरण्याची भीती भेडसावत आहे. त्यामुळे तातडीने औषध फवारणी करण्यात यावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख इरफान अब्दुल रहीम यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
याबाबत शेख यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विजय नगर भागातील वैभव कॉलनी, स्वामी समर्थ कॉलनी, मोरया कॉलनी, क्रांती चौक, ओमकार कॉलनी, शांती कॉलनी, सहारा कॉलनी, समर्थ कॉलनी, किनारा कॉलनी पवना नगर, आदर्श नगर आदी परिसरात डासांचे प्रमाण वाढले आहे व मलेरिया, तसेच डेंग्यू आजाराचीही भीती निर्माण झाली आहे.
त्यामुळे औषध फवारणीची आवश्यकता गरजेची झाली आहे. दरम्यान, या भागाचे कायमस्वरूपी रहिवासी नियमीत शासकीय व नीम शासकीय कर भरतात, तसेच मतदानाचा हक्क देखील बजावतात. मात्र, महापालिकेच्या वतीने योग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत.