आराध्य संगीत विद्यालय प्रस्तुत संगीत मंथन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा

आराध्य संगीत विद्यालय प्रस्तुत संगीत मंथन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा

लोकमराठी न्यूज : गुरुपौर्णिमा विशेष कार्यक्रम दिनांक २९ जुलै २०२३ रोजी ग. दी. माळगुळकर सभागृह येथे यशस्वी रित्या पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित देओरे सर, प्रसिद्ध तबला वादक डॉ. अतुल कांबळे व भाग्यश्री पेंधे कांबळे, गजानन अंतुरकर यांच्या उपसथिती मध्ये कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यालयातील मुलांनी गुरूंचे गुरुपुजन केले.

भारतीय शास्त्रीय संगीत संगीतातील प्रचलित राग व त्यावर आधारित गाणी अशी संकल्पना असलेल्या कार्यक्रमात विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असे सादरीकरण केले. त्याचप्रमाणे स्नेहछाया परिवारतील मुलांनी देखील सुंदर अशी प्रार्थना सादर केली.

नंतर गुरुगायन झाले. मंगेश दंडारे व कल्याणी मंगेश दंडारे यांनी गझल व अभंग सादर केले, भैरवी ने कार्यक्रमाचा शेवट झाला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते, तसेच मुलांचे आजी आजोबा नातलग मित्र परिवार यांनी हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. तबल्यावर साथ अशोक मांडवे, पखवाज पंढरी दरेकर, गिटार सुनील राठोड यांनी दिली. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पुनर्वसु इंगळे यांनी केले व आभारप्रदर्शन कल्याणी दंडारे यांनी केले. अश्याप्रकरे अतिशय सुंदर रित्या गुरुपौर्णिमाविशेष कार्यक्रम पार पडला.