नितिन गोलतकर, झाराप
कदाचीत फोटो पाहून काळजात धस्स होईल. अगदी माझ्या झाले तसेच. पण हा फोटो नाही टाकला तर हे भीषण वास्तव डोळे उघडेल तरी कसे? कोकण म्हणजे घनदाट जंगले, आणि वन्यजीवन फुलवणारा सुंदर निसर्ग. पण सद्यःस्थितीत हायवेवरुन प्रवास कराताना एक दोन दिवसानी एक तरी वन्यजीव गाडीखाली चिरडलेला किंवा गाडीच्या ठोकरीने मृत्युमुखी पडलेला दिसतोच. त्यात सरपटणारे अजगर, सरपटोळी सारखे प्राणी. कासव, कटींदर, कोल्हे, डुक्कर, मुंगुस आणि आज तर चक्क पणदुर गावा गवळ अत्यंत दुर्मिळ असे ‘चितळ'( asian spoteed deer) वाहनाच्या ठोकरीत मृत्युमुखी पडले. न्युज चॅनल वाल्यसांठी ही ब्रेकिंग न्युज असेल पण आमच्यासाठी ही हर्ट ब्रेकिंग न्युज आहे. बर्याच जणांना माहीत पण नसेल कदाचीत हे आपल्याकडे तळकोकणात सापडते. कारण सिंधुदुर्गात दर्शन सहसा आतापर्यंत झालेल नाही. कारण अत्यंत दुर्मिळ प्रकारात मोडणारा हा प्राणी.
प्रथेप्रमाणे वनखात्याकडून पंचनामा करुन फाईल बंद करण्यात येईल. पण या हायवेवर वन्यजीवांच्या होणार्या प्रत्येक मृत्युस वनखातेच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे जबाबदार आहे. गोवा ते रायगडपर्यंत वन्यजीवांच्या पाणवट्याच्या आणि मार्गक्रमण करण्याच्या पारंपारीक वाटेवरुन हा हायवे झालेला आहे. पण हायवे होत असताना एकाही ठिकाणी वनखात्याकडून वन्यजीवांच्या मार्गात अंडरपास करण्याची मागणी किंवा तशी उपायोजना केली गेलीच नाही.
थोडक्यात उदाहरण देतोय तेर्सेबांबार्डे आडेली बिबवणेच्या जंगलातून अनेक जंगली प्राणी हायवे ओलांडून पलीकडव कर्ली नदीतील पाणी पिण्यासाठी मार्गक्रमण करतात. पुर्वीचा हायवे लहान असल्यामुळे हायवे क्रॉस करणे शक्य असायच पण आता झालेल्या उंच आणि मोठ्या चौपदरी हायवे मुळे हायवे क्रॉस करताना अनेक जंगली प्राणी मृत्य़मुखी पडत आहेत. याला जबाबदार कोण? वन खाते आणि हायवे प्राधीकरण हे दोन्ही केंद्रसरकारच्या अखत्यारीत येतात मग येथे गफलत का झाली? वनखात्याकडून योग्य अभ्यास झाला असता आणि तसा अहवाल दिला गेला असता तर आज अनेक निष्पाप जीव वाचले असते.
बस्स बघत बसायच आता रोज उघड्या डोळ्यांनी या निष्पाप जीवांना निपचीत छिन्नविछिन्न पडलेलं…😢😢 ही वन्य विविधता आणि संपत्ती जपली गेली पाहिजे. कारण, हीच आपली खरी ओळख आहे. आणि त्यासाठी मायनिंग, औद्योगिक, औष्णिक प्रकल्पासारखे रेडकॅटेगरी मधील वन्यसंपत्ती नष्ट करणारे प्रकल्पांना विरोध होण गरजेच आहे. खरतर जबाबदार मी पण आहे, तुम्ही पण आहात, नाही नाही एव्हाना सगळेच आहेत. कारण विकास पाहीजे आहे ना आम्हाला..