काळेवाडी : ख्रिसमस व आगामी नववर्षाच्या निमित्ताने काँग्रेसचे युवा कार्यकर्ते व रॉयल फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष महाराष्ट्र राज्य रवि नांगरे यांच्यावतीने चिमुकल्यांना खाऊ व भेट वस्तू वाटप करण्यात आल्या. काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली भारत माता चौकात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या उत्साहात झालेल्या या कार्यक्रमाला परिसरातील बहुसंख्य पालकांनी आपल्या बालचमुंसह हजेरी लावली. त्यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
त्याप्रसंगी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष कैलास कदम, माजी महापौर कवीचंद भाट, युवक काँग्रेस अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, महिला नेत्या छाया देसले, सेवादलाचे अध्यक्ष नरेंद्र गायकवाड, पिंपरी विधानसभा युवक अध्यक्ष हिराचंद जाधव, विजय ओव्हाळ, माउली मलशेट्टी,आबा खराडे, विश्वास गजरमल, स्वप्निल बनसोडे, किरण नढे, प्रकाश नांगरे, अजय काटे, आनंद काटे, पंकज पाटोळे, अशोक गायकवाड, नरेंद्र नांगरे, प्रथम नांगरे, प्रकाश पठारे, काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभागाचे शहराध्यक्ष गणेश नांगरे, प्रतीक साळवी, आशा नांगरे, सामाजिक कार्यकर्त्या राधा काटे व हिरा साळवे, महेंद्र सोनवले यांच्यासह पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे लहान मुलांना आनंदाचे वातावरण निर्माण व्हावे, यासाठी रवि नांगरे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुलांनी शालेय कविता,भक्ती गीते, नाताळाचे गीते आणि डान्सही सादर करत उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी रवि नांगरे म्हणाले की, देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु हे लहान मुलांचा नेहमीच लाड करत असत. त्यामुळे लोक त्यांना चाचा नेहरू म्हणून संबोधतात. काँग्रेस पक्षात नेहरू व महात्मा गांधी यांचीच विचारसरणी आहे. त्यात ख्रिसमस सणाचे औचित्य साधून लहान मुलांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले. यात शेकडो पालक आपल्या मुलांना घेऊन सहभागी झाले होते. लहान मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून खुप समाधान वाटले.