महाशिवरात्री निमित्ताने वडगाव मावळात भाऊ बहिण भेटीचा कार्यक्रम संपन्न


वडगांव मावळ, दि.१८ (लोकमराठी) – मावळ महादेव मंदिर या ठिकाणी महाशिवरात्री निमित्ताने पहाटे पाच वाजता विश्वस्त सचिव अनंता कुडे, विश्वस्त तुकाराम ढोरे अरुण चव्हाण, किरण भिलारे,चंद्रशेखर सोपानराव म्हाळसकर यांचे हस्ते अभिषेक संपन्न झाला व नंतर सकाळी आठ वाजता रूढी -परंमपरेने चालत आलेला श्री पोटोबा महाराज व सांगवी येथील जाखमाता देवी या ठिकाणी पालखी सोहळा नेऊन भाऊ बहीण भेटीचा कार्यक्रम संपन्न झाला.


या प्रसंगी सांगवी ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले,नंतर तेथील पुजारी भक्त,कैलास खांदवे, शंकर पवार व देवस्थान चे विश्वस्त यांचे हस्ते श्री पोटोबा महाराज व जोगेश्वरी माता यांना इंद्रायणी स्नान करण्यात आले,नंतर देवस्थान चे वतीने जाखमाता देवीला साडी,ओटी,खन,नारळ यांचा मान देण्यात आला.सांगवी मधील भजनी मंडळ व काकडा आरती भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला व नंतर उपस्थित भाविकांला उपवासाच्या निमित्ताने फराळ,प्रसाद वाटप करण्यात आला.


या प्रसंगी देवस्थान चे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, उपाध्यक्ष गणेशआप्पा ढोरे,चंद्रकांत ढोरे,सुभाषराव जाधव, सुनिता कुडे, विणेकरी बबनराव भिलारे,शंकरराव म्हाळसकर,सुदामराव पगडे,पंढरीनाथ भिलारे, ,देवराम कुडे,सोपान मधुकर म्हाळसकर,मधुकर पानसरे,बाळासाहेब चव्हाण,हरियाली पानसरे,पुजारी समीर गुरव , ज्ञानेश्वर म्हाळसकर,रविंद्र तुमकर,महादू खांदवे,आदीसह भाविक उपस्थित होते,दिवसभर महादेव मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी झालेने, यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

Actions

Selected media actions