रिपब्लिकन पार्टी अॉफ इंडिया (आठवले गट) वाहतुक आघाडीच्या पच्छिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख पदी शशिकांत बेल्हेकर यांची नियुक्ती

पिंपरी चिंचवड (लोकमराठी) – रिपब्लिकन पार्टी अॉफ इंडिया (आठवले गट) वाहतुक आघाडीच्या पच्छिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख पदी शशिकांत रघुनाथ बेल्हेकर यांची नियुक्ती करण्यात आली. असे नियुक्ती पत्र बेल्हेकर यांना रिपब्लिकन पार्टी अॉफ इंडिया (आठवले गट) वाहतुक आघाडीचे महाराष्ट्र अध्यक्ष अजीजभाई शेख यांनी दिले.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार बेल्हेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सामाजिक बांधिलकीच्या जाणिवने पक्षाला अभिप्रेत असणारी संघटना उभारली पाहिजे. वाहतूकदारांच्या न्याय हक्कासाठी लढण्याची तत्परता दाखवून सक्रीय रहावे असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे.