युवक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा

युवक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा

पिंपरी, दि. १७ : महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत (Kunal Raut) यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त चिंचवड-बिजलीनगर येथील मातृसेवा सेवाभावी संस्थेमध्ये वृद्धांना आवश्यक गरजेच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले.

त्यावेळी भारतीय युवक काँग्रेसचे सचिव व महाराष्ट्र प्रभारी मितेंद्र दर्शन सिंग, राष्ट्रीय सचिव प्रदीप सिंधव, प्रदेश महासचिव अनिकेत नवले, महाराष्ट्र प्रदेश एनएसयुआयचे उपाध्यक्ष उमेश खंदारे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव चंद्रशेखर जाधव, जिल्हा अध्यक्ष कौस्तुभ नवले, सरचिटणीस विशाल कसबे, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष रोहित शेळके, पिंपरी विधानसभा अध्यक्ष प्रतीक जगताप, जिफिन जॉन्सन, मयुर रोकडे, मातृसेवा सेवाभावी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष सुहास गोडसे व कार्यकर्ते उपस्थित होते.

मातृसेवा सेनाभावी संस्था निराधार, वृद्ध महिलांचा संभाळ करते. आपणही समाजाचे काही तरी देणे लागतो या भावनेतून कुणाल राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेसचे सचिव चंद्रशेखर जाधव यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यावेळी भारतीय युवक काँग्रेसचे सचिव मितेंद्र दर्शन सिंग म्हणाले की, ” मातृसेवा सेवाभावी संस्था खुप चांगले काम करत असून संस्थेच्या मार्फत निराधार व वृद्धांना मोठा आधार मिळत आहे. समाजातील तळागाळापर्यंत विकास पोहचला पाहिजे, त्यांनाही सुखाने, समाधानाने जगता आले पाहिजे. हीच महत्त्वाकांक्षा काँग्रेस पक्षाचे नेते राहुलजी गांधी यांची आहे. “