पिंपरी चिंचवड युवक काँग्रेस तर्फे पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली

पिंपरी चिंचवड युवक काँग्रेस तर्फे पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली 

पिंपरी, दि. १४ फेब्रुवारी २०२३ : जम्मू काश्मीर मधील पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यातील शहीद जवानांना पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्याला आज ४ वर्षे झाली आहेत.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव चंद्रशेखर जाधव, गौरव चौधरी, जिल्हा अध्यक्ष कौस्तुभ नवले, सरचिटणीस विशाल कसबे, विनिता तिवारी, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष रोहित शेळके, पिंपरी विधानसभा अध्यक्ष प्रतीक जगताप, भोसरी विधानसभा अध्यक्ष जमीर शेख, जिफिन जॉन्सन व कार्यकर्ते उपस्थित होते.

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांकडून पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला होता आणि त्यामध्ये ४० जवान शहीद झाले. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली होती. या हल्ल्याला आता ४ वर्ष झाले आहेत. मात्र, या दहशतवादी हल्ल्याच्या कटू आठवणी अजूनही भारतीयांच्या मनात तश्याच आहेत. दरम्यान, ज्या जवानांनी प्राणाची आहुती दिली त्यांचे बलिदान न विसरता येणारे आहे. अशा भावना कौस्तुभ नवले यांनी व्यक्त केल्या.