
- नगरसेविका सुनिता तापकीर व राजदादा तापकीर यांच्या दूरदृष्टीतील टिकाऊ व खड्डेमुक्त रस्त्यांची प्रचिती
काळेवाडी : प्रभाग क्रमांक २७ मधील तापकीर नगर, ज्योतिबा नगर भागात विविध रस्त्यांचे काँक्रिटीकरण व पेव्हींग ब्लॉकची काम पुर्ण झाली आहेत. प्रशस्त व मजबूत झालेल्या रस्त्यांच्या कामांमुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. या कार्यात नगरसेविका सुनिता तापकीर व भाजप युवा मोर्चाचे चिंचवड विधानसभा अध्यक्ष राज तापकीर यांनी विशेष परिश्रम घेतले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक २७ मध्ये याआधी रस्त्यांचे डांबरीकरण केले जात होते. परंतू, काही कालावधीनंतर व खोदाईच्या कामामुळे रस्ते खराब होत. याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. महापालिकेला सेवा-सुविधा पुरविण्यासाठी विविध कर देऊन चांगले रस्ते मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती. हीच बाब लक्षात घेऊन टिकाऊ व खड्डेमुक्त रस्त्यांसाठी नगरसेविका सुनिता तापकीर यांनी प्रभागातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्याऐवजी काँक्रिटीकरण करण्याचा महापालिकेकडे आग्रह धरला. आणि प्रभागातील रस्त्यांची कामे करून घेतली.
दरम्यान, तापकीर नगरमधील साईराज कॉलनी, परिस कॉलनी एक व दोन, त्रिशक्ती कॉलनी, श्री स्वामी समर्थ कॉलनी तसेच ज्योतिबा नगरमधील गजानन कॉलनी एक, आदी रस्त्यांचे काँक्रिटीकरण व रंगीत पेव्हींग ब्लॉकचे काम पुर्ण झाले आहे. तसेच ड्रेनेज लाईन, पिण्याच्या पाण्याची लाईन, पथदिवे व खांबाचीही कामे झाली आहेत. चकचकीत व गुणवत्तापूर्ण अत्यावशक सेवांची पूर्तता झाल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
गेल्या दीड-दोन वर्षांपासून सरू असलेल्या कोरोना महामारीमुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत चालू असलेल्या विकास कामांची गती संथ होती. मात्र, कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याने विकास कामांना गती मिळत आहे. मात्र, अचानक पावसाचा जोर वाढल्यावर विकास कामांमध्ये व्यत्यय येतो. त्यामुळे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपणही आवश्यक ते सहकार्य करावे.
राज तापकीर, अध्यक्ष भाजप युवा मोर्चा, चिंचवड विधानसभा.
राज तापकीर, अध्यक्ष भाजप युवा मोर्चा,
चिंचवड विधानसभा.

