पिंपरी : पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनीट – ३ च्या पथकाने खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करुन ०५ जणांना अटक केले आहे. तसेच खुनाचा गुन्हा उघड केला आहे. मोबाईलचे पैसे मागितले म्हणुन राग आला आणि त्यामधुन हा खुन करण्यात आला असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.
१) सत्यजित शंकर कांबळे (वय- २३ वर्ष, सध्या रा. महादेव नगर, भोसरी, मुळगाव-सावळेश्वर, ता. कंधार, जि. नांदेड), २) निखील राजीव कांबळे (वय- २१ वर्ष, सध्या रा. महादेव नगर, भोसरी, मुळगाव-सावळेश्वर, ता. कंधार, जि. नांदेड), ३) रमेश नामदेव कांबळे (सध्या रा. कोऑफ कांबळे यांची खोली, सर्व्हे नं. २०५/२, महादेव कॉलनी, क्रं.२, भोसरी, मुळ रा. हडको एनडी ३१ सिद्धेश्वर मंदिर जवळ, ता. जि. नांदेड), ४) देवानंद उर्फ गौरव रमेश कांबळे (सध्या रा. कोऑफ कांबळे यांची खोली, सर्व्हे नं. २०५/२, महादेव कॉलनी, क्र. २, भोसरी, मुळगाव हडको एन डी ३१ सिद्धेश्वर मंदिर शेजार जवळ, ता. जि. नांदेड), ५) मानव महेंद्र कांबळे (वय-२१ वर्ष, सध्या रा. कोऑफ कांबळे यांची खोली, सर्व्हे नं. २०५/२ महादेव कॉलनी, क्रं.२, भोसरी, मुळ रा. हडको, एनडी ३१ सिद्धेश्वर मंदिर जवळ, ता. जि. नांदेड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर आकाश चंद्रकांत परदेशी (वय-२८ वर्ष, रा. महादेव नगर, भोसरी, ता. हवेली, जि. पुणे) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी मयत तरुण आकाश परदेशी याच्या भावाने फिर्याद दिली आहे.
पोलीस उपायुक्त संदिप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार (ता.७) रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास क्राईम कंट्रोल कडुन संदेश प्राप्त झाला की, दिघी पोलीस ठाणे हद्दीत एका इसमावर चाकुने वार करुन खुन करण्यात आला आहे. घटनास्थळी तात्काळ गुन्हे शाखा युनीट – ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड हे स्टाफ सह दाखल झाले. परंतु आरोपी हे मारहाण करुन पळुन गेले होते.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवुन गुन्हे शाखा युनीट – ३च्या पथकाने तीन तपास पथके तयार करुन आरोपींना शोधण्यासाठी रवाना केले.
पथकाने दिघी, कार्ला, लोणावळा, मुंबई, नांदेड या भागात सलग तीन दिवस आरोपींचा शोध घेत नातेवाईक तसेच मित्रांकडे सखोल तपास केला. आरोपी हे तपास पथकाची दिशाभूल करण्यासाठी सतत आपली राहण्याची ठिकाण बदलत होते. परंतु गुरुवारी (ता. १०) संभाजीनगर येथुन पथकाने शिताफिने दोन आरोपींना ताब्यात घेतले. तर इतर तीन आरोपींना नांदेड येथे गेलेल्या तपास पथकाने सलग चार दिवस शोध घेवुन आरोपींचा माग काढुन ताब्यात घेतले. या आरोपींना नांदेड ते किनवड असा पाठलाग करुन किनवड मार्गे तेलंगण राज्यात पळुन जाण्याच्या तयारीत असताना महाराष्ट्र सीमा नजीक किनवड पोलीस ठाणे हद्दीतील बोदडी गावच्या जंगलातुन शिताफिने अटक केले आहे. अटक केलेल्या आरोपींना पुढील कारवाई कामी दिघी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त डॉ. शशीकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदिप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, अंमलदार यदु आढारी, सचिन मोरे, विठ्ठल सानप, संदिप सोनवणे, प्रदिप राळे, मनोज साबळे, ऋषीकेश भोसुरे, सागर जैनक, राजकुमार हनमंते, रामदास मेरगळ, योगेश्वर कोळेकर, त्रिनयन बाळसराफ, समीर काळे, शशीकांत नांगरे, राहुल सुर्यवंशी, तांत्रिक विश्लेषन विभागाचे नागेश माळी यांच्या पथकाने मिळुन हि कामगिरी केली आहे.