
पिंपरी, दि. 8 (प्रतिनिधी) - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रहाटणी काळेवाडी विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महापालिकेच्या महिला आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उन्हापासून संरक्षण करण्यासाठी महिलांना दुपट्टा वाटप करण्यात आला.
त्यावळी योग गुरु सुरेश विटकर, सुजाता हरेश नखाते, तसलीम शेख, दत्तात्रय भट, एकनाथ मंजाळ, एकनाथ काटे, लक्ष्मण टोणपे, शंकर जाधव, आरोग्य अधिकारी आत्माराम फडतरे, कृष्णा येळवे, बाळासाहेब येडे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभाग प्रमुख गोरख पाटील यांनी केले. तर आभार चंद्रकांत गायकवाड यांनी मानले.