घरातून रुसून गेलेली मुलगी पोलिस मित्रांच्या सतर्कतेमुळे पालकांच्या ताब्यात

घरातून रुसून गेलेली मुलगी पोलिस मित्रांच्या सतर्कतेमुळे पालकांच्या ताब्यात

पिंपरी : घरातून रागाच्या भरात रुसून गेलेली मुलगी पोलिस मित्र संघटनेच्या सदस्या सूनिता दास यांच्या तर्कतेमुळे पालकांच्या ताब्यात देण्यात आली. ही घटना कासारवाडीत शुक्रवारी (ता. २० ऑगस्ट) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, कासारवाडी येथून सूनिता दास या आपल्या घरी जात होत्या. त्यावेळी एक संशयास्पद अनोळखी मुलगी त्यांना दिसली, तीची चौकशी केली असता, ती पिंपरी गावात राहत असल्याचे कळले.

त्यामुळे तीच्या पालकांचा शोध घेण्यासाठी दास तीला पिंपरी पोलिस चौकीमध्ये घेऊन गेले. तिथे पोलीस कर्मचाऱ्यांनी तीची विचारपूस केली असता, ती घरातून रागाच्या भरात निघून गेल्याचे कळले. आणि ती पिंपरी गावातील नवमहाराष्ट्र शाळेजवळ राहत असल्याचीही माहिती मिळाली.

त्यानंतर तात्काळ पोलीस कर्मचाऱ्यांनी तिच्या आई-वडिलांना संपर्क साधला आणि त्यांना ताबडतोब चौकीत बोलावून मुलीला त्यांच्या ताब्यात दिले. त्यानंतर पालकांनी सुटकेचा निश्वास टाकत पोलिस व पोलिस मित्र संघटनेचे आभार मानले.

Actions

Selected media actions