पुणे : आळंदीमध्ये हरिपाठ न आल्याने मुलाला बेदम मारहाण करण्यात आली. मुलाची प्रकृती नाजूक असून तो मागील आठ दिवसांपासून कोमात आहे. सध्या त्याच्यावर पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
ओम राजू चौधरी असे मारहाण झालेल्या मुलाचे नाव आहे. तर भगवान महाराज पोव्हणे असे मारहाण करणाऱ्या आरोपी महाराजांचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी मुलाची आई कविता राजू चौधरी यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार महाराजांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भगवान महाराज पोव्हणे याचे आळंदीत श्री माऊली ज्ञानराज कृपा प्रसाद अध्यात्मिक शिक्षण संस्था आहे. त्यात अनेक मूल अध्यात्मिक शिक्षण घेतात. गेल्या एक वर्षांपासून जखमी ओम देखील त्या ठिकाणी अध्यात्मिक धडे गिरवत आहे. १० फेब्रुवारीला ओमला हरिपाठ आला नाही म्हणून आरोपी भगवान पोव्हणे याने त्याला काठी ने बेदम मारहाण केली. यात फुफ्फुस आणि हृदयाच्या मधोमध मार लागला. दुसऱ्या दिवशी औरंगाबाद येथे कीर्तन असल्याने आरोपी पोव्हणे याने ओमसह सर्व मुलांना घेऊन त्या ठिकाणी गेला. तिथे गेल्यानंतर ओमची तब्बेत बिघडली. महाराजांनी ओमची आई कविता यांना फोन वरून मुलाची तब्बेत बरी नसल्याचे सांगितले.
तेव्हा, आई तातडीने त्या ठिकाणी गेली आणि मुलाला घेऊन आली. परंतु, प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने त्याच्यावर कविता काम करत असलेल्या रुग्णालयात उपचार सुरू केले. तो कोमात गेला होता, त्याची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने त्याला दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे त्याच्या छातीचा एक्सरे काढण्यात आला त्यात त्याच्या छातीत पाणी झाल्याचे स्पष्ट झाले असून पुन्हा त्याला पिंपरी-चिंचवडमधील डी. वाय. पाटील रुग्णालयात हलवले, त्याच्या छातीतून दोनशे मिली पाणी काढण्यात आले आहे. दरम्यान, तो अतिदक्षता विभागात असून ओम कोमात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
- Tamil Nadu Floods : बंगालच्या उपसागरावरील दबावामुळे तामिळनाडूत मुसळधार पाऊस
- KARJAT : कर्जतमध्ये वाय.के. हॉटेलचे उद्घाटन
- ‘लाडकी बहीण योजने’साठी पुन्हा मुदतवाढ; आता या तारखेपर्यंत अर्ज करता येणार…
- PIMPRI CHINCHWAD : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न ; ०५ जणांना अटक
- महिलेच्या धाडसामुळे वाचला तरुणाचा जीव
भगवान महाराज पोव्हणे याच्यांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला एका सप्ताह मधून अटक करण्यात आली आहे. ओमची प्रकृती बरी व्हावी म्हणून डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत.