महेश प्रोफेशनल फोरम पिंपरी-चिंचवड तर्फे आयोजित ‘SAMVID – 2022’ सत्र उत्साहात

महेश प्रोफेशनल फोरम पिंपरी-चिंचवड तर्फे आयोजित 'SAMVID - 2022' सत्र उत्साहात

पिंपरी : महेश प्रोफेशनल फोरम या पिंपरी-चिंचवड येथे कार्यरत सामाजिक संस्थेद्वारे नुकतेच “SAMVID – 2022” या माहितीपूर्ण सत्राचे आयोजन ऑटोक्लस्टर चिंचवड येथे करण्यात आले होते.

कार्यक्रमाला १५० हून अधिक श्रोत्यांची उपस्थिती होती आणि तिनही प्रमुख वक्त्यांनी उपस्थितांना अतिशय उत्तम मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला MPF झोन तीनचे SAMVID झोनल गव्हर्नर श्यामसुंदर भुतडा, SAMVID अतिरिक्त गव्हर्नर सीए विमल करणानी, एमएफसीटीच्या अध्यक्षा- नियुक्त श्रुती करणानी, संस्थेचे अध्यक्ष प्रसन्न राठी, SAMVID संचालक संपत सोमाणी, आणि इतर मान्यवर उपस्थित होते. SAMVID 2022 मध्ये IOT आणि शिक्षण क्षेत्रातील भविष्यातील संधीवर तीन सत्रात चर्चा करण्यात आली.

पहिले सत्र शेखर मालाणी यांनी भविष्यातील आयटी तंत्रज्ञानावर दिले. दुसरे सत्र दिनेश भुतडा यांचे अपारंपरिक शिक्षण क्षेत्रावर होते. तिसरे सत्र नितीन बनाईत यांनी ई-मोबिलिटी या विषयावर घेतले. तिन्ही सत्रांना उपस्थितांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

महेश प्रोफेशनल फोरम पिंपरी-चिंचवड तर्फे आयोजित 'SAMVID - 2022' सत्र उत्साहात

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्वेता ईन्नाणी यांनी सुव्यवस्थित पार पाडले. श्रोत्यांच्या अपत्यांसाठी संजय जाखोटीया व चेतन भंसाली यांनी विज्ञान भवनची सहल आयोजित केली होती. कार्यक्रमाचे संचालक संपत सोमाणी यांच्या आभार प्रदर्शनाने आणि राष्ट्रगीताने सत्राची सांगता झाली.

महेश प्रोफेशनल फोरम पिंपरी-चिंचवड तर्फे आयोजित 'SAMVID - 2022' सत्र उत्साहात