- तिसरे मोफत होमिओपॅथी शिबिर संपन्न
पिंपरी : सप्तर्षी फाउंडेशन, रहाटणी व प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी पुणे यांच्यातर्फे वाकड येथील लक्ष्मीबाई बारणे उद्यान येथे विषेश (दिव्यांग) मुलांकरीता मोफत होमिओपॅथी तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन सविता खुळे (सभापती, महिला व बालकल्याण पिंपरी चिंचवड महानगरपालिका), पोलीस निरीक्षक संतोष पाटील (गुन्हे शाखा, वाकड पोलीस स्टेशन), गोपाळ माळेकर (स्विकृत सदस्य) मिलिंद करंजकर (मनोचिकित्सा विभाग, जिल्हा रुग्णालय, सांगवी) या मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. सदर शिबिरास मान्यवरांनी उपस्थित राहून सप्तर्षी फाउंडेशन सतत करत असलेल्या विविध समाजोपयोगी कार्यासाठी सप्तर्षी फाउंडेशनला प्रोत्साहन दिले व पुढील कार्याकरिता शुभेच्छा दिल्या.
दिव्यांग मुलांचा संभाळ करण्यामध्ये पालकांचा वेळ, ऊर्जा, पैसा व काही प्रमाणात आशा संपुष्टात आलेली असते, अशा पालकांसाठी सप्तर्षी फाउंडेशन व प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी यांनी आशेचा किरण निर्माण केला आहे. ऑगस्ट २०२१ पासून सुरू केलेल्या या प्रयत्ना अंतर्गत शेकडो दिव्यांगांच्या कुटुंबांना खूप मोठा आधार सप्तर्षी फाउंडेशन च्या माध्यमातून मिळाला आहे.
सदर उपक्रमाअंतर्गत नोंदणी झालेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना मोफत कायमस्वरूपी उपचार दिले जातात. नोंदणी झाल्याशिवाय शिबिरास प्रवेश दिला जात नसल्याने गर्दी टाळूनही शेकडो लाभार्थी लाभ घेत आहे, सदर शिबिरात कोरोना संदर्भात योग्य ती दक्षता घेतली जाते. या शिबिरात विशेष (दिव्यांग) मुलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच मोफत औषधे देण्यात आली. शिबिरामध्ये शंभर पेक्षा अधीक लाभार्थ्यांनी लाभ घेतला.
सदर शिबिर कै. डॉ. प्रफुल्ल विजयकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित केले जाते, कै.डॉ. प्रफुल्ल विजयकर यांनी 2005 साली सेवा भावातून विशेष मुलांसाठी महाबळेश्वर येथे चारिटेबल होमिओपॅथिक कॅम्पची सुरुवात केली. आज पर्यंत विजयकर सरांमुळे हजारो विशेष मुलांना निस्वार्थ भावनेतून शास्त्रशुद्ध होमिओपॅथी उपचार घेता आले आहेत.
या शिबिरात लाभ घेतलेल्या दिव्यांग मुलांच्या पालकांचे अभिप्राय
संजय चोपडे – दिव्यांग लाभार्थी – प्रणव चोपडे
सप्तर्षी फाउंडेशन यांनी चालवलेला हा उपक्रम फारच कौतुकास्पद आहे, यामुळे माझ्यासारख्या पालकांना आपल्या पाल्या मध्ये काहीतरी चांगले होईल याची आशा निर्माण झाली आहे. येथील डॉक्टर व सहयोगी स्टाफ यांचे सर्वांचे सहकार्य अतिशय चांगले आहे. माझ्या या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा, सप्तर्षी फाउंडेशन व डॉक्टरांचे आभार.
– संजय चोपडे
दिव्यांग लाभार्थी – रुद्र तोडकरी
सप्तर्षी फाउंडेशन सोबत माझा संपर्क मागील सहा वर्षांपासून आहे. फाउंडेशनचे काम खूपच चांगले आहे दिव्यांगासाठी ते एक संजीवनी चे काम करत आहे. प्रत्येक आयोजित कार्यक्रमांमध्ये त्यांचे योगदान नियोजनबद्ध असते, कोणालाही गैरसोय होणार नाही याची ते काळजी घेतात. डॉक्टरांचे ही विशेष आभार त्यांची ट्रीटमेंट सकारात्मक लागू होत आहे, याचा फायदा माझा पाल्य रुद्र रवींद्र तोडकरी यास झालेला आहे, निशुल्क ट्रीटमेंट साठी सप्तर्षी फाऊंडेशनचे मनःपूर्वक आभार.
– रवींद्र तोडकरी, पिंपळे गुरव.
दिव्यांग लाभार्थी – प्राजक्ता घुगे
सप्तर्षी फाउंडेशनचा हा उपक्रम अतिशय स्तुती करण्यास योग्य आहे, अतिशय मनापासून येथे पालकांची काळजी घेतली जाते. वेळोवेळी घेतलेल्या शिबीर व इतर योजनांसाठी असलेली व्यवस्था अतिशय व्यवस्थित आहे. शिबिरातील औषधांचा माझ्या कन्येला फायदा झाला आहे, हे फाउंडेशन दिव्यांगांसाठी करत असलेले काम उल्लेखनीय आहे. या उपक्रमाला आम्हा पालकांना देखील काहीतरी हातभार लावता आला तर नक्कीच आनंद, आम्ही यासाठी नेहमी तत्पर आहोत.
-पांडुरंग किसन घुगे, सद्गुरु नगर, भोसरी, पुणे 39.
सप्तर्षी फाउंडेशनने गेले अनेक वर्षे दिव्यांगा सोबत काम करत आहे, त्यासोबतच संस्थेच्या विविध सामाजिक क्षेत्रातील कामगिरी खालील प्रमाणे आहे.
• स्वर्ग संस्कार अभियाना अंतर्गत ५०० पेक्षा अधिक बेवारस मृत व्यक्तींवर अंत्यविधी.
• शीतऋतु संरक्षण अभियानाअंतर्गत १००० पेक्षा अधिक ब्लॅंकेट वितरण.
• दिव्यांगाचे प्रमाणपत्र, ओळखपत्र (UDID) साठी १००० पेक्षा दिव्यांग व्यक्तींना प्रत्यक्ष मदत.
• निरामय आरोग्य योजनेतून तीन हजार पेक्षा अधिक क्लेम मंजुरी.
• शेकडो दिव्यांगांना आधार कार्ड व पॅन कार्ड मिळण्यासाठी प्रत्यक्ष मदत.
• विविध आरोग्य शिबिर अंतर्गत हजारपेक्षा दिव्यांगाच्या कुटुंबांना लाभ.
• कोरोना काळात शेकडो गरजूंना मोफत अन्नधान्य व गरजेच्या वस्तूंचे वितरण.
• दुष्काळ मुक्त मराठवाडा अभियानाअंतर्गत मराठवाड्यात जलसंधारणाचे मोठे कार्य.
कार्यक्रमाला सहकार्य व मार्गदर्शन
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या कार्यालयातर्फे सहाय्यक पोलीस आयुक्त दिसले, नगरसेवक नाना काटे, बापू काटे, बाबा त्रिभुवन, मयूर कलाटे, अभिषेक बारणे, कैलास बारणे, अण्णा नखाते, उन्नती फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे, स्विकृत सदस्य संदीप नखाते, चॅलेंजर पब्लिक स्कलचे संस्थापक यांचे
तसेच निलेश ज्ञानेश्वर नखाते, काटे फुड्सचे मालक अविनाश काटे, भवानी मेडिकल, रहाटणी, रामभाऊ बुलेट चहाचे मालक रामभाऊ, महालक्ष्मी हार्डवेयरचे परमार, ओपेराई लांच होमचे पिराप्पा, संतोष माने, रमेश नलावडे, शासकीय अधिकारी रविकिरण घोडके, संतोष शिंदे यांनी कार्यक्रमाला विषेश सहकार्य केले या मुळे कार्यक्रम सुनियोजत पद्धतीने संपन्न झाला.
वैद्यकीय सहाय्य
या शिबिरात प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी तर्फे डॉ. रजत मालोकार, डॉ. निवेदिता हांडे, डॉ. प्रियांका धमाळ, डॉ. नीरज कुलकर्णी, डॉ. रोहित देशमुख, डॉ. दिप्ती मालोकार, डॉ. आश्लेषा देशमुख, डॉ. श्रद्धा लांजेवार व सहायक डॉ. अनुक्रमे सौम्य चतुर्वेदी, शिवानी पाल, शिवप्रताप सिंग, होनी ओसवाल, सिमरन जाधव, मुग्धा दिवाकर इत्यादी डॉक्टर उपस्थित होते.
सप्तर्षी फाउंडेशनचे संस्थापक सचिव मनोजकुमार बोरसे, विशाल पवार, विशाल घंदुरे, मच्छिंद्र वीर, नंदकुमार आहेर, समीना काझी, श्रद्धा नगरे, जयश्री डांगे संस्थेच्या वतीने उपस्थीत होते
पालक प्रतिनिधि मधून स्वयंसेवक सतीश ढगे, महेश चौधरी, संतोष कांबळे, रविंद्र तोडकरी. व स्वयंसेवक साक्षी भाट, हर्षल सुरूशे, शुभम पिंपळे, वैशाली नारखेडे, तनुजा सुरवसे, निशा जाधव, विकास दुरकर इत्यादी उपस्थित होते.
मनोजकुमार बोरसे म्हणाले की, “संस्थेचे विविध संकल्प आणि प्रकल्प राबविण्यासाठी संस्थेच्या अध्यक्षा वैशालीताई मुळे, सचिव श्रीकांत चव्हाण व सदस्य वरून सावरे यांचे मार्गदर्शन वेळोवेळी प्राप्त होते.”