पिंपरी : महात्मा फुले महाविद्यालयातील वाणिज्य शाखेतील प्राध्यापक किरण बापू मोहिते यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने नुकतीच पीएच.डी प्रदान करण्यात आली आहे.
‘नाबार्ड अधिकोषाचे आदिवासी शेतकऱ्यांच्या आर्थिक व सामाजिक विकासातील योगदानाचे चिकित्सक अध्ययन’ या विषयावर प्रा. मोहिते यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रा. रामकृष्ण मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आकुर्डी येथील संशोधन केंद्रात आपला अभ्यास पुर्ण केला. अण्णासाहेब वाघेरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ओतूर येथील डॉ. तानाजी साळवे यांनी त्यांचे मार्गदर्शक म्हणून काम पाहिले.
प्रा. किरण मोहिते यांना पीएचडी प्रदान झाल्याबद्दल महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचाऱ्याच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.