
- राज्यस्तरावर निरंतर धाडसत्र सुरू
- एका दिवसात १०२ गुन्ह्यांची नोंद
- १६ लाख ३४ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त
मुंबई ता, १२ (लोकमराठी) : राज्यातील सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद असून अवैध मद्य निर्मिती, वाहतूक, विक्री विरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्यस्तरावर निरंतर धाडसत्र सुरू आहे. काल एका दिवसात (११ एप्रिल २०२०) राज्यात १०२ गुन्हे नोंदविण्यात आले असून ४६ आरोपींना अटक करण्यात आली. ८ वाहने जप्त करण्यात आली असून १६ लाख ३४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबरोबरच २४ मार्च ते ११ एप्रिलपर्यंत पूर्ण लॉकडाऊन कालावधीमध्ये राज्यात २ हजार ३८३ गुन्हे नोंदविण्यात आले असून ९३७ आरोपींना अटक, तर ११५ वाहने जप्त करण्यात आली असून ५ कोटी ७१ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
येथे करा तक्रार
अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्रीविरुद्ध तक्रार स्वीकारण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा २४×७ नियंत्रण कक्ष सुरू आहे. या नियंत्रण कक्षाचा टोल फ्री क्रमांक १८००८३३३३३३ तर व्हाट्सअॅप क्रमांक ८४२२००११३३ असा आहे. यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते. नमूद क्रमांकावर अवैध मद्याबाबतची तक्रार नोंद करण्यात यावी, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत करण्यात आले आहे.
- PIMPRI : ट्रेडमार्क कायद्याचा भंग; दोघांविरोधात गुन्हा दाखल
- Hadapsar : एस. एम. जोशी कॉलेजमध्ये ‘उद्योजकता’ विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न
- Hadapsar : सी.ए.टी.सी. 707 कॅम्प एन.सी.सी स्पर्धेमध्ये एस. एम. जोशी कॉलेज द्वितीय
- SSC Results 2025 : पिंपरी-चिंचवड शहराचा निकाल ९७.९७ टक्के
- यशाचा कळस इच्छाशक्ती जिद्द व सराव या त्रिसूत्रीवर अवलंबून आहे – आयआरएस अधिकारी अभिजीत पाखरे