अहमदनगर : Ahmednagar जिल्ह्यातील राजूर, शाहूनगर आणि अकोले (Akole) तालुक्यातील अवैध दारू विक्री बंद करावी व शाहूनगर व राजूरला पोलीस अधीक्षकांनी भेट द्यावी. यासाठी आज अहमदनगर येथे पोलीस अधिक्षक राकेश ओला (Rakesh Ahla) यांना सामाजिक कार्यकर्ते व लेखक हेरंब कुलकर्णी (Herambh Kulkarni) यांनीनिवेदन दिले. सोबत सावली संस्थेचे नितेश बनसोडे होते.
यावेळी कुलकर्णी यांनी तालुक्यात होणारी अवैध विक्री, रात्रीची चोरटी वाहतुक याविषयी त्यांना माहिती दिली. राजूर येथील दारू विक्रेत्यांना मदत करणाऱ्या पोलिसांच्या बदल्या करा, बिट अंमलदार यांना तालुक्यात जबाबदार धरा. अशी मागणी यावेळी कुलकर्णी यांनी केली, सोबत सावली संस्थेचे नितेश बनसोडे होते.