Tag: Ahmednagar Police

अहमदनगर : अकोले तालुक्यातील अवैध दारू विक्री बंद करा 
महाराष्ट्र, मोठी बातमी

अहमदनगर : अकोले तालुक्यातील अवैध दारू विक्री बंद करा

अहमदनगर : Ahmednagar जिल्ह्यातील राजूर, शाहूनगर आणि अकोले (Akole) तालुक्यातील अवैध दारू विक्री बंद करावी व शाहूनगर व राजूरला पोलीस अधीक्षकांनी भेट द्यावी. यासाठी आज अहमदनगर येथे पोलीस अधिक्षक राकेश ओला (Rakesh Ahla) यांना सामाजिक कार्यकर्ते व लेखक हेरंब कुलकर्णी (Herambh Kulkarni) यांनीनिवेदन दिले. सोबत सावली संस्थेचे नितेश बनसोडे होते. यावेळी कुलकर्णी यांनी तालुक्यात होणारी अवैध विक्री, रात्रीची चोरटी वाहतुक याविषयी त्यांना माहिती दिली. राजूर येथील दारू विक्रेत्यांना मदत करणाऱ्या पोलिसांच्या बदल्या करा, बिट अंमलदार यांना तालुक्यात जबाबदार धरा. अशी मागणी यावेळी कुलकर्णी यांनी केली, सोबत सावली संस्थेचे नितेश बनसोडे होते. ...
उल्लेखनीय : भरोसा सेलमुळे कर्जत उपविभागात ७२ दांपत्यांचा संसार सुरळीत
मोठी बातमी, महाराष्ट्र

उल्लेखनीय : भरोसा सेलमुळे कर्जत उपविभागात ७२ दांपत्यांचा संसार सुरळीत

अहमदनगर : कर्जत पोलीस उपविभागातील भरोसा सेल कडून अनेक दांपत्य आणि पीडित पुरुष व महिलांचे समुपदेशनाद्वारे संसार सुरळीत करण्याच्या प्रयत्नांना यश आले असून या भरोसा सेल मुळे अनेकांचे प्रपंच मार्गाला लागले आहे. यात कर्जत उपविभागात एकूण ७२ प्रकरणात समझोता होऊन त्यांच्या आयुष्याच्या निसटलेल्या रेशीमगाठी पुन्हा घट्ट झाल्याने कुटूंबासह नातेवाईकांतही समाधानाचे वातावरण आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून पोलीस उपविभागासाठी भरोसा सेलसह या सेलचे अधिकाधिक प्रभावी होण्यासाठी ग्रामीण भागाच्या अडचणी पाहता कर्जत जामखेड पोलीस ठाण्यात महिलांच्या सुरक्षेसाठी खेडोपाडी तात्काळ पोहचण्यासाठी चार दुचाकी दोन चार चाकी(योद्धा वाहने)कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आली.यामुळे महिलांच्या तक्रारीकामी याद्वारे थेट मदत मिळते आहे. गुन्हे...
गोठ्याची भिंत उचकटून चांदे खुर्दमध्ये शेळ्यांची चोरी | कर्जत तालुक्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच
महाराष्ट्र

गोठ्याची भिंत उचकटून चांदे खुर्दमध्ये शेळ्यांची चोरी | कर्जत तालुक्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच

अहमदनगर : गोठ्याची भिंत फोडून चोरट्यांनी एक शेळी व दोन करडे लंपास केले. ही घटना सोमवारी (ता. १६) रात्री चांदे खुर्द (ता. कर्जत) येथील भोसले वस्ती येथे घडली. किशोर भोसले असे शेळी मालकाचे नाव आहे. भोसले यांच्या घराशेजारीच गोठा असून त्यामध्ये ते जनावरे ठेवत असतात. शेळी व करडांसह इतर जनावरे घटनेच्या दिवशी नेहमीप्रमाणे गोठ्यात बांधून भोसले घरामध्ये झोपले होते. त्यावेळी चोरट्यांनी गोठ्याच्या पाठीमागील दगडी भिंत अलगत उचकटून शेळी व दोन करडे चोरून नेले. भोसले यांना सकाळी ही बाब लक्षात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, काही दिवसांपुर्वी मुळेवाडी येथे तीन शेळ्यांची तर योगेश मुळे यांच्या घरामध्ये चोरी झाली होती. कर्जत तालुक्यात चोरीच्या घटना सातत्याने घडत असल्याने पोलिसांसमोर चोरांना पकडण्याचे मोठ...
पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली सैनिकाला अटक | अटकेच्या निषेधार्थ माजी सैनिकांचे धरणे आंदोलन
महाराष्ट्र, मोठी बातमी

पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली सैनिकाला अटक | अटकेच्या निषेधार्थ माजी सैनिकांचे धरणे आंदोलन

अहमदनगर : पत्नीला आत्महत्येसह प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली सैन्यदलातील सैनिकाला कर्जत पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेच्या निषेधार्थ माजी सैनिकांनी कर्जत येथील हुतात्मा स्मारक येथे सोमवारी (ता. २) धरणे आंदोलन केले. प्रदिप अनिल शिंदे (रा. पाटेगाव) असे अटक केलेल्या सैनिकांचे नाव आहे. तर स्नेहा प्रदिप शिंदे असे मृत विवाहितेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २८ ऑक्टोबरला स्नेहा यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना प्रदिप यांना समजताच ते कर्तव्यावर असलेल्या ठिकाणांहून कमांडींग ऑफिसरच्या सूचनेनुसार थेट कर्जत पोलिस ठाण्यात हजर झाले. तेथून ते पोलिसांसह पत्नीच्या अंत्यविधीसाठी गावी गेले. मात्र, स्नेहा यांच्या आईने प्रदिप यांच्यासह सासरची मंडळी व इतर नातेवाईकांविरोधात फिर्याद दिल्याने कर्जत पोलिसांनी प्रदिप यांना अटक केली. फिर्यादीत म्हटले आहे की, ...