Tag: Ahmednagar News

KARJAT : आमदारांनी भाजपातील आयारामांना सोडून नगरपंचायत निवडणूक लढवावी – राम शिंदेचे रोहित पवार यांना खुले आव्हान
महाराष्ट्र

KARJAT : आमदारांनी भाजपातील आयारामांना सोडून नगरपंचायत निवडणूक लढवावी – राम शिंदेचे रोहित पवार यांना खुले आव्हान

भाजपाकडून १७ जागेसाठी ६३ इच्छुकांच्या मुलाखती संपन्न कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत नगरपंचायतीसाठी आपल्या सत्तेच्या काळात १५१ कोटी रुपयांचा विकासनिधी उपलब्ध करून विविध विकासकामाच्या माध्यमातून कर्जत शहराचा चेहरा-मोहरा बदलू शकलो, याचे आपणांस समाधान आहे. आगामी निवडणुकीत याच विकासकामाच्या जोरावर मतदार आपल्यावर विश्वास ठेवून पुन्हा भाजपाची सत्ता कायम राखण्यात सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन माजीमंत्री प्रा. राम शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी पक्षाचे निवडणूक निरीक्षक बाळासाहेब महाडीक, तालुकाध्यक्ष डॉ सुनील गावडे, जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, शहराध्यक्ष वैभव शहा, अनिल गदादे, पप्पू धोदाड, गणेश पालवे, सुमित दळवी आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना राम शिंदे म्हणाले की, मागील निवडणुकीत कर्जतकराच्या मतदानरुपी सहकार्यामुळे भाजपाची एक हाती सत्ता असताना कर्जत नगरपंचायतीच्या माध्यमा...
कर्जत तालुक्यात नवीन जिल्हा परिषद गटाची निर्मिती होणार : पप्पू शेठ धोदाड यांच्या मागणीला यश
महाराष्ट्र

कर्जत तालुक्यात नवीन जिल्हा परिषद गटाची निर्मिती होणार : पप्पू शेठ धोदाड यांच्या मागणीला यश

कर्जत : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2021-22 साठी कर्जत तालुक्यात जिल्हा परिषदेचा एक नवीन गट आणि पंचायत समितीच्या दोन गणाची वाढ करण्यात यावी अशी मागणी कुंभेफळ ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच पप्पू शेठ धोदाड यांनी काही दिवसांपुर्वी केली होती. त्यानुसार तालुक्यातील वाढीव मतदार संख्या लक्षात घेऊन होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणूकी साठी प्रशासनाने नवीन जिल्हा परिषद गट स्थापन करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू केल्या असून नवीन जिल्हा परिषदेच्या एका गटाची तर पंचायत समितीच्या दोन गटाची निर्मिती होणार असल्याचे समोर येत आहे. कर्जत ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रुपांतर झाल्याने तालुक्यातील जिल्हापरिषदेचा एक गट कमी झाला होता. वाढीव लोकसंख्या विचारात घेऊन जिल्हा परिषदेच्या चार गटा ऐवजी पाच गट व्हावेत या धोदाड यांच्या मागणीनुसार कर्जत तालुक्यात कोरेगाव जिल्हा परिषदेच्या नवीन गटाची न...
अहमदनगर जिल्हा बँकेच्या संचालकपदी बाळासाहेब साळुंके यांची निवड
महाराष्ट्र

अहमदनगर जिल्हा बँकेच्या संचालकपदी बाळासाहेब साळुंके यांची निवड

कर्जत : अहमदनगर जिल्हा बँकेच्या संचालकपदी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. दि.२६ रोजी अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या बोर्ड मिटींगमध्ये ही निवड करण्यात आली. या निवडीनंतर साळुंके यांच्या समर्थकांनी कर्जत व तालुक्यातील गावांमध्ये ठिकठिकाणी जल्लोष करत साळुंके कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या. काही महिन्यांपुर्वी पार पडलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बाळासाहेब साळुंके यांच्या पत्नी जिल्हा बँकेच्या माजी संचालिका तथा पंचायत समितीच्या माजी सभापती मिनाक्षी साळुंके यांना केवळ एका मताने पराभव झाला होता. मात्र हा पराभव केवळ तालुक्याच्याच नव्हे तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही जिव्हारी लागला होता. कारण मतदानाच्या अगोदर झालेल्या नाट्यमय खेळीची आणि त्यातच जवळ राहून कुरघोड्या केलेल्या तालुक्यातील अनेक नेत्यांच्या छुप्या डावाची चर्चाही लपू...
#Karjat कोरेगाव शिवारात बिबट्या मृत अवस्थेत
महाराष्ट्र

#Karjat कोरेगाव शिवारात बिबट्या मृत अवस्थेत

कर्जत : कोरेगाव (ता कर्जत) येथे चार वर्ष वयाचा बिबट्या मृत अवस्थेत आढळला. रामसिंग परदेशी यांच्या उसाच्या शेतात विशाल परदेशी या युवकाला प्रथमदर्शनी मृत बिबट्या दिसला. त्याने तात्काळ कर्जत वनविभागाशी संपर्क साधत सदर घटनेची माहिती दिली. सोमवारी (दि २२) सकाळी साडेदहाच्या सुमारास कोरेगाव येथील रामसिंग परदेशी यांच्या उसाच्या शेतात चार वर्ष वयाचा बिबट्या मृत आढळला. विशाल परदेशी या युवकाने तात्काळ कर्जतचे वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके यांना खबर दिली. शेळके यांनी वनविभागाचे कर्मचारी यांना सोबत घेत घटनास्थळ गाठले. जवळपास दोन-तीन दिवसापूर्वीच सदर बिबट्याचा नैसर्गीक मृत्यु झाला असल्याचे सांगितले. घटनास्थळी पंचनामा करून बिबट्याचे दहन करण्यात येईल, अशी माहिती मोहन शेळके यांनी पत्रकारांना दिली. डोंबाळवाडी आणि कोरेगाव शिवारात बिबट्याच्या दर्शनाने मोठी भीती निर्माण झाली होती. मात्र त्य...
Ahmednagar News : कर्जत नगरपंचायतीसाठी प्रभागनिहाय सुधारीत आरक्षण सोडत संपन्न
महाराष्ट्र

Ahmednagar News : कर्जत नगरपंचायतीसाठी प्रभागनिहाय सुधारीत आरक्षण सोडत संपन्न

कर्जत : कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी नवीन आदेशानुसार पीठासीन अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले आणि सहायक पीठासीन अधिकारी गोविंद जाधव यांनी सोमवारी सकाळी ११ वाजता १५ प्रभागासाठी पुन्हा नव्याने आरक्षण सोडत पार पाडली. यामध्ये तीन प्रभागात बदल घडला असून बाकी ठिकाणी जैसे थे परिस्थिती राहिली आहे. नवीन आदेशानुसार कर्जत नगरपंचायतीच्या प्रभागासाठी पीठासीन अधिकारी डॉ अजित थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत नगरपंचायतीच्या १७ पैकी १५ प्रभागासाठी सोमवारी राजकीय पदाधिकाऱ्याच्या उपस्थितीमध्ये प्रभागनिहाय आरक्षण सोडत संपन्न झाली. प्रभाग क्रमांक १५ आणि १६ अनुसूचित जातीसाठी राखीव असून उर्वरित १५ प्रभागासाठी शुभ्रा श्रीकांत यादव, प्रणाली दीपक सुतार आणि राजवीर शिवानंद पोटरे या लहान मुलांकडून उपस्थितासमोर आरक्षण सोडत पार पडली. यामध्ये प्रभाग क्रमांक २ जोगेश्वरवाडी भागात नामा...
कर्जत नगरपंचायत निवडणुकीच्या १३ जागेसाठी ६४ उमेदवारांचे ७६ उमेदवारी अर्ज पात्र, छाननी प्रकियेत १३ अर्ज बाद
महाराष्ट्र, राजकारण

कर्जत नगरपंचायत निवडणुकीच्या १३ जागेसाठी ६४ उमेदवारांचे ७६ उमेदवारी अर्ज पात्र, छाननी प्रकियेत १३ अर्ज बाद

कर्जत : कर्जत नगरपंचायतीच्या १३ जागेसाठी ८९ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. बुधवारी सदर ८९ उमेदवारी अर्जाची छाननी प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ अजित थोरबोले आणि सहायक निवडणूक अधिकारी गोविंद जाधव यांनी पार पाडली. यामध्ये १३ उमेदवारी अर्ज अवैध ठरले असून ६४ उमेदवारांचे ७६ उमेदवारी अर्ज निवडणुकीस पात्र ठरले असल्याची माहिती डॉ थोरबोले यांनी दिली. कर्जत नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. कर्जत नगरपंचायतीसाठी ७ डिसेंबर अखेर १७ प्रभागासाठी १०० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. मात्र सुप्रीम कोर्टाच्या ओबीसी आरक्षण आदेशानुसार तसेच राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कर्जत नगरपंचायतीमधील नामप्र ४ प्रभागाची निवडणूक स्थगित करण्यात आली. त्यामुळे कर्जत नगरपंचायतीच्या १३ जागेसाठी ८९ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. बुधवारी सकाळी ११ वाजता प्रांताधिकारी डॉ अजित...