Tag: coronavirus

प्लाझ्मा थेरपी : कोरोनावर मात करण्यासाठी वरदान
मोठी बातमी, आरोग्य

प्लाझ्मा थेरपी : कोरोनावर मात करण्यासाठी वरदान

2020 हे साल संपूर्ण जगासासाठी कठीण संकटाचे आणि अडचणींचे ठरले आहे. या वर्षात कोरोना, लॉकडाऊन, क्वॉरंटाईन सारखे नववीन शब्द सामान्य माणसाच्या शब्दकोशात दाखल झाले. महाराष्ट्र शासन कोरोनावर मात करण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहे. आणि त्यात यशस्वी देखील झाला आहे. महाराष्ट्राने प्लाझ्मा उपचार करण्यास सुरुवात केली अहे. आपण प्रथमच ह्या प्लाझ्मा उपचाराचे नाव ऐकले असणार पण हा उपचार काही नवीन नाही. याचा शोध 130 वर्षां पूर्वी जर्मनीच्या फिजियोलॉजिस्ट एमिलवॉन बेह्रिंग यांनी लावला होता. यासाठी त्यांना नोबल पारितोषिकही देण्यात आले होते. वैद्यकीय क्षेत्रातील हे पहिलेच नोबेल पारितोषिक होते. संसर्गजन्य रोगांवर उपचार म्हणून अनेक दशकांपासून प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जात आहे. यापूर्वी सार्स (2003) आणि मर्स (2012) मध्ये प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार केले गेले होते. कोरोना विषाणू देखील या प्रकारात येतात. 1918 ...
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विद्यार्थ्यांचा प्रवास मोफत करा; आप युवा आघाडीची मागणी
महाराष्ट्र, मोठी बातमी

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विद्यार्थ्यांचा प्रवास मोफत करा; आप युवा आघाडीची मागणी

मुंबई : मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सर्व अडकलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवास मोफत करण्यात यावा. अशी मागणी आम आदमी पक्षाच्या युवा आघाडीने केली आहे. आम आदमी पक्षाच्या युवा आघाडीने निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकारने रातोरात आपला निर्णय बदलून मोफत एस टी बस सेवा ही केवळ महाराष्ट्रात अडकलेल्या परराज्यातील मजुरांसाठी असेल असा निर्णय दिला. एका बाजूला शासनाने कोटा शहरातून विद्यार्थ्यांना आराम बसमधून मोफत आणले, दुसरीकडे पुण्या-मुंबई सारख्या ठिकाणी रोजगाराची संधी शोधत, स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना दुप्पट तिकीट आकारण्याचा निर्णय म्हणजे गेले दीड महिने अडकून पडले, विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा आहे. हे सर्व विद्यार्थी परीक्षांच्या अनिश्चित वेळापत्रकाअभावी या शहरांमध्ये थांबून होते. यातील बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबामधून अस...
दीडशे फूट लांबूनच घेतले अंत्यदर्शन; कर्मचाऱ्यांनी अपुऱ्या सुरक्षा साधनात केले अंत्यसंस्कार
पिंपरी चिंचवड

दीडशे फूट लांबूनच घेतले अंत्यदर्शन; कर्मचाऱ्यांनी अपुऱ्या सुरक्षा साधनात केले अंत्यसंस्कार

पिंपरी : घरातील एखाद्या व्यक्‍तीचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या कुडीला कवटाळून धाय मोकलून रडताना आपण अनेकदा पाहिले आहे. मात्र करोनाच्या या संकटामुळे रक्‍ताची नाती दुरावत असल्याचेही आता पहायला मिळत आहे. पुण्यातील एका करोना बाधिताचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी अंत्यसंस्कारास नकार दिला. मुलगा आणि भाऊ फक्‍त या दोघांनीच दीडशे फूट लांबून अंत्यदर्शन घेतले. मृतदेहावर अंत्यसंस्काराची वाट न पाहता स्मशानभूमीतून काढता पाय घेतला. अखेर वायसीएममधील कर्मचाऱ्यांनी जीवावर होऊन कोणतीही सुरक्षा साधने उपलब्ध नसताना अंत्यसंस्कार करून माणुसकीचे दर्शन घडविले. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना हा साथीचा आजार आहे. या आजाराने मृत्यू झाल्यावर मृतदेह प्लास्टिकमध्ये गुंडाळून नातेवाईकांच्या ताब्यात देतात. महापालिका कर्मचाऱ्याच्या उपस्थितीत मयत व्यक्‍तीवर अंत्यसंस्कार केले जा...
Lockdown : माकडांची उपासमार टाळण्यासाठी मराठवाडा जनविकास संघाने उचलला माकडांच्या खाद्याचा भार
सामाजिक, महाराष्ट्र

Lockdown : माकडांची उपासमार टाळण्यासाठी मराठवाडा जनविकास संघाने उचलला माकडांच्या खाद्याचा भार

उस्मानाबाद : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य माणसाप्रमाणे मुक्या प्राण्यांनाही झळ पोहचत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील (परांडा) सोनारी येथे माकडांचे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य आहे. येथील कालभैरवनाथ मंदिर सुरक्षिततेसाठी भाविकांसाठी बंद असल्याने माकडांना खायला मिळणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे या वन्यप्राण्यांना पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघ व सोनारी ग्रामस्थांच्या वतीने खाद्य पुरविण्यात सुविधा केली आहे. या सुविधेचा शुभारंभ मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, भैरवनाथ अन्नछत्र ट्रस्टचे अध्यक्ष महेश कारकर, कोषाध्यक्ष रविंद्र खुळे, सहसचिव अशोक माने, सदस्य भिमा घाडगे, डोनजे गावचे सरपंच गजेंद्र सूर्यवंशी, संतोष भोरे, बापू शिंदे, विलास शिंदे, दिनेश घोगरे, सचिन भोरे, विनायक गंगाविठ्ठल, अक्षय भोरे, अक्षय भोरे अशोक भोरे, चंद्रकांत भोरे, हन...
Coronavirus : पुणे, पिंपरीत पाच रुग्णांचा मृत्यू, दिवसभरात ११६ नवे रुग्ण
पुणे

Coronavirus : पुणे, पिंपरीत पाच रुग्णांचा मृत्यू, दिवसभरात ११६ नवे रुग्ण

पुणे : पुणे शुक्रवारी दिवसभरात पुणे शहरात चार, तर पिंपरी-चिंचवडमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे पुणे, पिंपरी आणि परिसरातील मृतांची संख्या ७१ झाली आहे. दिवसभरात पुणे शहरात १०४ तर पिंपरी-चिंचवडमध्ये १२ असे ११६ नवे रुग्ण आढळले असून परिसरातील एकूण रुग्णसंख्या ११०१ वर पोहोचली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाने शुक्रवारी रात्री याबाबत माहिती दिली आहे. ससून रुग्णालयात उपचार घेणारे ४० आणि ६३ वर्षीय, तर इतर खासगी रुग्णालयात उपचार घेणारे ४० आणि ५२ वर्षीय रुग्ण शुक्रवारी दगावले. या सर्व रुग्णांना श्वासोच्छ्वासाचे तसेच हृदयरोगाशी संबंधित गुंतागुंतीचे आजार होते. पिंपरी-चिंचवडमध्ये ६५ वर्षीय रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. पुणे शहरातून शुक्रवारी १६ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १४६ झाली आहे. पिंपरी-चिंचवडमधून एकूण २१ रुग्ण बरे होऊन घरी ...
लेखक डी.सी. पांडे यांच्यातर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप
सामाजिक, पुणे

लेखक डी.सी. पांडे यांच्यातर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप

पुणे : कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने सर्व जनजीवन विस्कळित झाले आहे. अशा परिस्थित गोरगरिबांची उपासमार होऊ नये, यासाठी लेखक व प्राध्यापक डी. सी. पांडे सर यांनी पुढाकार घेत वाघोली व खराडी परिसरात गरजूंना अन्नधान्य वाटप केले. खराडी पोलिस ठाण्याच्या मार्फत खराडी लेबरकॅम्प व दर्गा परिसरात अन्न धान्य वाटप करण्यात आले. तसेच वाघोली पोलिस ठाण्याच्या मार्फत गरीब व गरजू नागरिकांना अन्न धान्य वाटप केले. त्यावेळी खराडी पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी तापरे व विश्वास पाटील, वाघोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक नितीन अटकरे, डी.सी.पांडे सर, डॉ. सरीता पांडे, सामाजिक कार्यकर्ते दिपक चखाले, प्रविण दिवटे व सागर गायकवाड आदी उपस्थित होते. दरम्यान, डी.सी.पांडे हे प्रसिद्ध लेखक असून त्यांच्या आयआयटी जेईई आणि एनईईटी परीक्षेसाठी 13 ...
Covid-19 : पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले आणखी १२ करोनाबाधित रूग्ण
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

Covid-19 : पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले आणखी १२ करोनाबाधित रूग्ण

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. एकाच दिवसात तब्बल १२ करोनाबाधित आढळल्याने सध्या शहरात भीतीचे वातावरण आहे. पिंपरी चिंचवडमधील करोनाबाधितांचा संख्या ७९ वर पोहचली आहे. आतापर्यंत २१ जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. करोनामुळे आज ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याचे समोर आलं आहे. दरम्यान, आज सापडलेल्या १२ करोना बाधितांमध्ये लहान मुले, महिला, पुरुष यांचा समावेश असल्याची माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात करोना विषाणूने आणखीच फास घट्ट आवळला असून एकाच दिवसात तब्बल १२ जण करोना पॉजीटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. यात महिला, लहान मुले आणि पुरुष आहेत अशी माहिती महानगर पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे. त्यामुळे शहरातील करोना बाधितांची संख्या ७९ वर पोहचली असून चिंता वाढली आहे. करो...
Coronavirus : खरेदीत मलई खाण्यासाठी अधिकाऱ्याला दमबाजी
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

Coronavirus : खरेदीत मलई खाण्यासाठी अधिकाऱ्याला दमबाजी

पिंपरी : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी चालविलेल्या प्रत्येक खरेदीत आपल्या मर्जीतल्या ठेकेदारांना वाढीव दराने काम देण्यासाठी काही माजी पदाधिकारी वरिष्ठ नेत्यांचा दबाव आणण्याचा निर्ल्लज प्रकार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सुरु आहे. जादा दराने ठराविक ठेकेदारांकडून खरेदी करण्यास एका अधिकाऱ्याने विरोध केला असता मंगळवारी काही माजी पदाधिकाऱ्यांनी मनपा आवारातच त्याला दमबाजी केली. वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रकाराचा धसका घेतल्याने त्या अधिकाऱ्याला व्हील चेअरच्या सहाय्याने थेट रुग्णालयात दाखल करावे लागले. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. कोरोनाचा वाढता संर्संग रोखण्यासाठी संपूर्ण शहर लॉकडाऊन असून मनपाचे केवळ १० % कर्मचारी कामावर आहेत. तसेच महानगरपालिकेची मार्च व एप्रिल महिन्याच्या सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आल्या असून स्थायी समितीच्या बैठकासुद्धा रद्द करण्यात आल्या आ...
covid-19 : पिंपरी-चिंचवड शहर मध्यरात्रीपासून होणार सील
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

covid-19 : पिंपरी-चिंचवड शहर मध्यरात्रीपासून होणार सील

पिंपरी (लोकमराठी) : कोरोना विषाणूने जगभरात थैमान धालते असून देश, राज्याबरोबर शहरातही कोरोना बाधितांची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाचा सामुदायिक प्रसार रोखण्यासाठी महापालिका आयुक्त श्रावण हार्डिकर यांनी रविवारी (दि. 19 एप्रिल) मध्यरात्री बारापासून 27 एप्रिलपर्यंत संपूर्ण शहरच सील करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शहराच्या सर्व सीमा आणि प्रमुख रस्ते बंद करण्यात आले. महापालिका आयुक्तांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, नागरिकांच्या हालचाली व बाहेर फिरण्यावर मर्यादा आणण्यासाठी संपूर्ण शहर सील केले आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार सोमवारपासून ( दि. 20) नागरिकांना काही सवलती देण्यात येणार होत्या. मात्र, त्या दिल्यास कोरोनाचा आणखी प्रसार होऊ शकतो. त्यात शहरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र असून पुणे शहरासह चाकण, हिंजवडी औद्योगिक क्षेत्र लागून आहे. त्यामुळे नोकरी आणि कामा...
मद्याचा ८३ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त
पुणे

मद्याचा ८३ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त

पुणे (लोकमराठी) : टाळेबंदी काळात अवैधरीत्या परराज्य आणि जिल्ह्य़ांमधून पुण्यात मद्य आणण्याच्या प्रकरणांमध्ये, तसेच शहरासह जिल्ह्य़ात मद्याची वाहतूक केल्याच्या प्रकरणांमध्ये राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून मद्य तसेच वाहने वगैरे मिळून तब्बल ८३ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी २०१ गुन्हे दाखल झाले असून ४५ जणांना अटक करण्यात आली आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, केंद्र व राज्य सरकारने टाळेबंदी लागू करण्याआधीच पुण्यात करोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जमाव आणि संचारबंदी लागू केली होती. याबरोबरच जिल्हाधिकारी राम यांनी शहरासह जिल्ह्य़ातील मद्यविक्रीची दुकाने, तसेच मद्यालये पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार असल्याचे आदेश प्रसृत केले होते. परिणामी २० मार्चपासू...